Maharashtra SSC Result 2021 Online: दहावीचा निकाल मोबाइल आणि mahresults.nic.in वेबसाइटवर कसा पाहाल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

SSC Result 2021 Online and Offline: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board SSC Result 2021) MSBSHSE दहावी 2021 परीक्षेचा निकाल 16 जुलै दुपारी एक वाजेच्या सुमारास जाहीर करण्यात येणार आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे या परीक्षेचा निकाल लावण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना आपला हा निकाल ऑनलाइनच पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

महाराष्ट्र दहावी बोर्डाने दहावीची परीक्षा न घेतल्याने विद्यार्थी नेमके कसे पास होणार याचीच चिंता अवघ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या पालकांना लागून राहिली आहे. पण अंतर्गत मूल्यमापन ही पद्धत बोर्डाकडून निकालासाठी आकारली गेली आहे. प्रत्येक वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच जाहीर केला जात असे पण गेले दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे निकाल जुलै महिन्यात जाहीर केले जात आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, यंदाच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेले आहे. पाहा दहावीचा निकाल आपण ऑनलाइन आणि विशेषत: मोबाइलवर कसा पाहता येईल.

महाराष्ट्र दहावी निकाल 2021 – mahresult.nic.in वर आपला निकाल कसा पाहाल?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने SSCचा निकाल result.mh-ssc.ac.in वर जाहीर करण्यात येईल.

ADVERTISEMENT

SSC Result 2021 – निकाल नेमका कसा पाहाल?

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे दहावी (SSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.in यावर जाहीर करणार आहे.

  • नेमका निकाल कसा पाहता येणार?

  • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन

  • होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र दहावीचा निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा.

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.

  • यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.

  • त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.

  • समजा, तुमचा सीट नंबर M234897 असेल आणि तुमच्या आईचे नाव मनिषा असं असेल तर तुम्ही M234897 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच MAN असं टाकावं लागेल.

  • त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल काही क्षणात आपल्याला दिसेल.

Maharashtra SSC Result 2021: MSBSHSE 10th निकालाविषयी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी

महाराष्ट्र दहावीचा निकाल 2021: मोबाइलवरुन कसा पाहता येणार निकाल?

दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आपल्या मोबाइलवरुन देखील दहावीचा निकाल पाहता येणार आहे. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाइट या क्रॅश होतात किंवा इंटरनेट उपलब्ध नसेल तर SSC निकाल हा त्यांना SMS द्वारे पाहाता येणार आहे.

SMSद्वारे एसएससीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHSSC ” असं टाकून 57766 वर SMS पाठवायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMSच्या स्वरुपात येईल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT