महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र लेचंपेचं नाही, कुणीही आलं अन् मोडून काढलं; उद्धव ठाकरेंचा अमित शाह यांना टोला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र लेचपेचं नाही की कुणीही आलं आणि मोडून काढलं असं म्हणत मुख्मयंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना टोला लगावलाची जोरदार चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे. एवढंच नाही तर गुलाबराव पाटील यांच्याबाबत बोलताना मुख्मयंत्री उद्धव ठाकरे असंही म्हणाले की ‘गुलाबराव असं म्हणाले होते की दिल्लीत जाऊन बसण्यापेक्षा मी महाराष्ट्र उभा करेन.’ हाच संदर्भ देऊन मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘काही लोक दिल्लीत जाऊन नुसतेच उभे राहतात त्यांना साधं बसायलाही मिळत नाही’ असं म्हणत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्याआधी सहकार खातं नव्याने तयार करण्यात आलं आणि त्याची धुरा अमित शाह यांच्या खांद्यावर देण्यात आली.

ज्यानंतर यावरून विरोधक आक्रमक झाले. सहकार मंत्रालय स्थापन करून आणि ते अमित शाह यांच्याकडे देऊन भाजपला महाराष्ट्र आणि गुजरात येथील सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवायचं आहे असा आरोप विरोधकांनी केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सहकारी चळवळींवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजपची ही खेळी आहे असंही विरोधकांनी म्हटलं आहे. भाजपला सहकारी चळवळीवर पूर्ण नियंत्रण हवं आहे. त्यासाठी वेगळं मंत्रालय तयार करून अमित शाह यांना या खात्याची धुरा देण्यात आली आहे. सहकार हा राज्यांचा विषय असून संविधानाच्या सातच्या अनुसूचीत त्याचा सहभाग आहे. संसदेत विधेयक न आणता मंत्रालय कसं काय तयार केलं जाऊ शकतं असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेनिथाला यांनी विचारला होता.

शिवसेनेने सहकार चळवळीचं राजकारण गरीब शेतकऱ्यांना जगवत असतं. सहकार क्षेत्र जगवणं, टिकवणं, त्याला बळ देणं हे केंद्राचं काम आहे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालय देण्यात आलं आहे त्यांचं स्वागत करायला हवं असं म्हणत सामनातून अमित शाह यांचं कौतुक केलं होतं. आता मात्र महाराष्ट्रातली सहकार चळवळ लेचीपेची नाही की कुणीही यावं आणि मोडून काढावी असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाच टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आपल्याला माहित आहेच बंद खोलीतल्या चर्चेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात 2019 मध्ये काय काय घडलं होतं. भाजप आणि शिवसेना यांच्यात काडीमोड तर झालाच. पण 25 वर्षांहून अधिक काळ युतीत असलेले हे दोन पक्ष एकमेकांना पाण्यातच पाहू लागले. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड झालेली भेट ही चांगलीच चर्चेत होती. भाजप असो की शिवसेना एकमेकांवर टीका करण्याची आणि एकमेकांना टोले मारण्याची संधी दोन्ही पक्ष सोडत नाहीत हे दिसतं आहे.

आज सहकार क्षेत्राशी संबंधित असलेल्या गुलाबराव पाटील यांचा जन्मशताब्दी सोहळा होता. या सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण होतं. मात्र ते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. सहकार क्षेत्रासंदर्भातला कार्यक्रम असल्यानेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना टोला लगावल्याची चर्चा आहे.

दरम्यान आज झालेल्या भाषणात प्रविण दरेकरांनाही उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. प्रविण दरेकर भाषणात असं म्हणाले होते की राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपण एकत्र आलं पाहिजे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की राजकारणाच्या पलिकडे जायचं म्हणजे कुठे जायचं? मधे काही भिंत वगैरे असते का? असं म्हणत त्यांनी दरेकरांनाही टोला लगावला आणि नाव न घेता अमित शाह आणि चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT