Covid 19 : महाराष्ट्राची चिंता वाढली! दिवसभरात 3900 कोरोना रूग्णांची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात 20 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे
Covid 19 : महाराष्ट्राची चिंता वाढली! दिवसभरात 3900 कोरोना रूग्णांची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात 3900 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्राची चिंता यामुळे वाढली आहे यात काही शंका नाही. कारण मंगळवारी ही संख्या 2172 रूग्णांची नोंद झाली आहे. मात्र आज दिवसभरात 3900 रूग्णांची नोंद झाली आहे. रोज वाढत जाणारी ही संख्या चिंतेची बाब ठरते आहे. महाराष्ट्रात तिसरी लाट येण्याची ही सुरूवात आहे असंही तज्ज्ञांमध्ये बोललं जातं आहे.

did coronas new variant delmicron  wreak havoc in europe and america covid 19 corona omicron
did coronas new variant delmicron wreak havoc in europe and america covid 19 corona omicron(प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: ट्विटर)

महाराष्ट्रात दिवसभरात 1306 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आत्तापर्यंत एकूण 65 लाख 6 हजार 137 रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के झाले आहे. राज्यात दिवसभरात 20 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात सध्या 1 लाख 22 हजार 906 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 905 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 14 हजार 65 सक्रिय रूग्ण आहेत. गेल्या आठवड्यापासून आजपर्यंत सक्रिय रूग्णांची संख्याही वाढते आहे.

आज राज्यात 3900 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,65,386 झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

Covid 19 : महाराष्ट्राची चिंता वाढली! दिवसभरात 3900 कोरोना रूग्णांची नोंद
Mumbai Third wave : मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात?; आकडेवारीतून स्पष्ट संकेत

एकट्या मुंबईत 2510 रूग्णांची नोंद

मुंबईत कोरोनाच्या रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये चांगलीच वाढते आहे. मुंबईत दिवसभरात 2510 पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 251 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 लाख 48 हजार 788 बरे झाले आहेत. मुंबईतील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97 टक्के आहे. असं सगळं असलं तरीही गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वाढणारी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या टेन्शन वाढवणारी आहे.

मुंबईत कसे वाढत गेले रूग्ण पाहू

28 डिसेंबर - 1377 रूग्णांची नोंद

27 डिसेंबर - 809 रूग्णांची नोंद

26 डिसेंबर - 922 रूग्णांची नोंद

25 डिसेंबर-757 रूग्णांची नोंद

24 डिसेंबर-683 रूग्णांची नोंद

23 डिसेंबर- 602 रूग्णांची नोंद

22 डिसेंबर 490 रूग्णांची नोंद

21 डिसेंबर 327 रूग्णांची नोंद

जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.Omicron Variant/India today

महाराष्ट्रात ओमिक्रॉन संसर्गाचे 85 रूग्ण

आज राज्यात 85 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. या पैकी 47 रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) तर 38 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने ( आयसर) रिपोर्ट केले आहेत. एन आय व्ही ने रिपोर्ट केले 47 रुग्णांमध्ये 43 आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि 4 निकटसहवासित आहेत.

दिवसभरात आढळलेले 85 रूग्ण कुठे कुठे आहेत?

मुंबई- 34

नागपूर आणि पिंपरी चिंचवड-प्रत्येकी 3

नवी मुंबई आणि पुणे महापालिका-प्रत्येकी 2

पनवेल, कोल्हापूर आणि बुलढाणा -प्रत्येकी 1 रूग्ण

आयसर संस्थेने रिपोर्ट केलेले 38 रुग्ण समुदाय सर्वेक्षणातून आढळले असून प्राथमिक माहितीवरुन त्यांचा कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील खालीलप्रमाणे –

मुंबई -19

कल्याण डोंबिवली -5

नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी 3

वसई विरार आणि पुणे मनपा – प्रत्येकी 2

पुणे ग्रा. , भिवंडी निजामपूर , पनवेल, ठाणे मनपा – प्रत्येकी 1

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in