बिघडलंय तर इंजिन पण बदलले डबे ! Cabinet Expansion वरुन महाविकास आघाडीतल्या नेत्यांची मोदींवर टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार बुधवारी पार पडला. या मंत्रीमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून अनेक दिग्गजांना पायउतार व्हावं लागलं आहे. १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांना या मंत्रीमंडळ विस्तारात शपथ देण्यात आली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र या विस्तारावरुन मोदी सरकारवर चांगलीच टीका केली आहे.

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत, बिघडलंय तर इंजिन पण बदलले डबे, व्वा मोदीजी व्वा असं ट्विट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही मोदींच्या मंत्रीमंडळात निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून आयारामांना संधी दिल्याबद्दल निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातून ४ खासदारांना मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळालं आहे. नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. या चार खासदारांपैकी तीन खासदार हे बाहेरील पक्षांमधून आलेले आहेत. दरम्यान नारायण राणेंना मोदींच्या मंत्री मंडळात स्थान देण्यावरुन राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती.

शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने राणेंची निवड केल्याचं बोललं जातंय. या मंत्रीमंडळ विस्तारावर शिवसेनेनेही आपली प्रतिक्रीया दिली आहे. नारायण राणेंपेक्षा संभाजीराजेंना मंत्री केलं असतं तर महाराष्ट्राचा सन्मान झाला असता असं म्हणत शिवसेनेने नारायण राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत एका ओळीची प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं वैर महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. 2005 पासून म्हणजेच नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हापासून ते महाविकास आघाडी सरकार स्थापन होईपर्यंत शिवसेना आणि नारायण राणे हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला असताना शिवसेनेने त्यांच्या धोरणाला साजेशी अशीच प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT