Satara मधील आंबेघरमध्ये मोठी दुर्घटना, 3 जणांचे मृतदेह हाती; तब्बल 39 जण बेपत्ता

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरणा विभागात आंबेघर येथे गुरूवारी मध्यरात्री दरड कोसळली. यामध्ये गावातील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. ज्यापैकी तीन कुटुंबातील तब्बल 39 नागरिक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या पैकी 3 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत अन्य किती जण दगावले आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सध्या बेपत्ता असलेल्या नागरिकांचा शोध घेणं युद्धपातळीवर सुरू आहे.त

24 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेघर गावापासून सात किलोमीटर आधी पावसामुळे पूल वाहून गेल्याने घटनास्थळावर यंत्रणा पोहोचणे मुश्किल झाले होते. मात्र चौदा तासानंतर 24 जुलै रोजी अकरा वाजता NDRF ची टीम घटनास्थळावर पोहोचली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर युद्धपातळीवर येथील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने मृतांबाब अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, यावेळी एनडीआरएफला काही ग्रामस्थ देखील घटनास्थळी मदत करत आहेत.

दरम्यान, पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने आणि काही ठिकाणी रस्ते अद्यापही पाण्याखाली असल्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. यावेळी प्रशासकीय यंत्रणा आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

ADVERTISEMENT

दुसरीकडे पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. पाटण तालुक्यात आंबेघर, ढोकावळे, मोरगिरी, कामरगाव, गुंजाळी, काठेवाडी (घेरादात्तेगड), टोळेवाडी, कातवडी-मेष्टेवाडी आदीसह अनेक ठिकाणी डोंगर-दरडी ढासळले आहेत.

ADVERTISEMENT

साताऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळून आतापर्यंत तब्बल 14 जणांचा मृत्यू

दरम्यान, सातारा (Satara)जिल्ह्यातील सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे. यातच सातारा जिल्ह्यातील आंबेघरसह वेगवेगळ्या ठिकाणी मिळून तब्बल 14 जणांचा दरड कोसळून मृत्यू (14 Death) झाल्याचं समजतं आहे.

Satara मध्ये भीषण परिस्थिती, दरड कोसळून अनेकजण ढिगाऱ्याखाली

सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT