बायकोचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ What’s App स्टेटसवर, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईच्या मालाड भागातील कुरार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ३० वर्षीयवर पतीवर गुन्हा दाखल केला आहे. आपल्या पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ मोबाईलवर शूट करत तिला घरी परत येण्यासाठी पती दबाव टाकत होता. पतीने हा व्हिडीओ आपल्या What’s App वर स्टेटस म्हणून ठेवल्यानंतर पत्नीच्या घरच्यांना याबद्दल माहिती कळली आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पतीने अपलोड केलेला व्हिडीओ हा एक वर्ष जुना आहे. ज्यावेळी आरोपी आणि त्याची पत्नी ठाण्यात एकत्र राहत होते त्यावेळी हा व्हिडीओ नवऱ्याने शूट केला होता. आरोपी पतीच्या परिवाराकडून पत्नीच्या परिवाराला हुंड्याच्या मागणीसाठी वारंवार दबाव टाकला जात होता. पतीच्या परिवाराकडून पीडित पत्नीच्या परिवाराला वारंवार नवीन फ्लॅटची मागणी होत होती.

साथ मरेंगे म्हणत प्रेमी युगुलाने घेतला गळफास, तरुणाचा मृत्यू; दोर तुटल्यामुळे विवाहीत महिला वाचली

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यानंतर पत्नीने आपल्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. कालांतराने या जोडप्याने जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलांच्या जन्मानंतर आरोपी पतीने पत्नीकडे तक्रार मागे घेण्याची विनंती केली. परंतू यानंतरही सासू-सासऱ्यांचे टोमणे कमी न झाल्यामुळे पीडित महिला आपल्या माहेरी रहायला आली. यानंतर पती आपल्या पत्नीला वारंवार घरी येण्याची विनंती करत होता.

नागपूर : ३२ वर्षीय महिलेचा २५ वर्षाच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला; तरुणाची प्रकृती गंभीर

ADVERTISEMENT

परंतू पत्नीने घरी परतण्यास नकार दिल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला आंघोळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. What’s App स्टेटसवर ठेवलेला फोटो पीडित महिलेच्या बहिणीने पाहिल्यानंतर आपल्या बहिणीला याची माहिती दिली. ज्यानंतर कुरार पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

नांदेडमधल्या हदगावात बेकायदा खोदकाम सुरू असताना सापडला महिलेचा मृतदेह

    follow whatsapp

    ADVERTISEMENT