9 बायकांसह राहणाऱ्या नवऱ्याने बनवलं 'रोमान्स टाइम टेबल', पण...

9 बायकांसह राहणाऱ्या एका व्यक्तीने रोमान्स टाइम टेबल बनवलं होतं. पण यामुळेच त्याला अडचणीचा सामना करावा लागला. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.
9 बायकांसह राहणाऱ्या नवऱ्याने बनवलं 'रोमान्स टाइम टेबल', पण...
man living with 9 wives made time table for romance love viral news(सौजन्य-Arthur O Urso/Instagram)

एका व्यक्तीच्या तब्बल एक-दोन नव्हे तर 9 बायका आहेत. या सगळ्या बायकांसोबत रोमान्स करण्यासाठी खास टाइम टेबलच बनवलं आहे. जेणेकरून कोणत्याही पत्नीला वाईट वाटणार नाही आणि सर्वांसोबत योग्य वेळ घालवता येईल असं त्याला वाटतं. पण त्या व्यक्तीच्या एवढ्या प्रयत्नांनंतरही 'रोमान्सचं टाइम टेबल' काही प्रभावी ठरलं नाही.

खरं तर, ब्राझीलचा रहिवासी असलेला आर्थर ओ उर्सो हा 9 महिलांसोबत लग्न करून जगभर चर्चेत आला होता. 'रोमान्सचं टाइम टेबल' बनवणे हे निरुपयोगी असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. तो म्हणाला- 'माझ्या आयुष्यात खूप मजा आणि आनंद आहे. सुरुवातीला मी भेटीची वेळ देऊन रोमान्स करण्याचा प्रयत्न केला.'

आर्थर पुढे म्हणाला- 'पण रोमान्स करण्यासाठी जे वेळापत्रक बनवलं होतं. त्याचं पालन करताना अनेक समस्या आल्या. कधी-कधी वाटायचं की वेळापत्रकामुळे मला जबरदस्ती रोमान्स करावा लागत आहे. हा एक प्रकारचा दबाव होता. असं वाटत होतं की मी हे आनंदासाठी करत नाहीये.'

आर्थर म्हणतो की, मुक्त प्रेम साजरे करण्यासाठी आणि एक पत्नीत्वाला विरोध करण्यासाठी त्याने 9 विवाह केले आहेत.

सामान्यतः कोणत्याही वैवाहिक जीवनात जसे चढ-उतार होतात तसेच आर्थरच्या वैवाहिक जीवनातही अनेक चढउतार झाले आहेत. त्याच्या एका पत्नीने घटस्फोट घेण्याचे आधीच ठरवले आहे. आर्थर म्हणाला - 'मी फक्त तिचाच राहावा अशी तिची इच्छा आहे. पण त्याला काही अर्थ नाही.' असं आर्थर म्हणतो.

आर्थर पुढे म्हणाला- 'विभक्त होण्याच्या विचारामुळे मी खूप दुःखी झालो आहे आणि त्याहीपेक्षा त्याच्या कारणांबद्दल आश्चर्य वाटतं. कारण आता ती म्हणतेय की, तिला एकपत्नीत्व संबंधांची आठवण येते.'

आर्थर म्हणाला- जेव्हा तुम्हाला खूप बायका असतात तेव्हा लक्ष किंवा आपुलकी द्यायला जास्त वेळ लागत नाही. 'टाइम टेबल रोमान्स' आमच्यासाठी योग्य नव्हता. म्हणून आम्ही ती गोष्ट थांबवली.

man living with 9 wives made time table for romance love viral news
9 बायकांसोबत राहतो हा तरुण, 'या' कारणासाठी सोशल मीडियावर आहे चर्चेत

आर्थरचा असा विश्वास आहे की, तो कोणासोबत किती वेळ रोमान्स करतो याचा त्याच्या बायकांना फारसा फरक पडत नाही. मात्र, भेटवस्तूंबाबत पत्नींमध्ये मत्सर आहे. तो म्हणाला- 'जेव्हा मी एका बायकोला महागडी आणि दुसर्‍या पत्नीला लहान किंवा स्वस्त गिफ्ट देतो तेव्हा त्यांच्यात मत्सर निर्माण होतो.'

Related Stories

No stories found.