27 तारखेपर्यंत मराठा समाजाने संयम बाळगावा, संभाजीराजे छत्रपती आवाहन

जाणून घ्या संभाजीराजे यांनी नेमकं काय म्हटलं आहे ?
27 तारखेपर्यंत मराठा समाजाने संयम बाळगावा,  संभाजीराजे छत्रपती आवाहन

27 तारखेपर्यंत मराठा समाजाने शांत रहावं असं आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकार राज्यावर तर राज्य सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे. मी सध्या सामंजस्याची भूमिका स्वीकारली आहे काही लोक टीमटीम करत आहेत. मी येत्या 27 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मराठा समाजाची भूमिका मांडणार आहे असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

ही चर्चा झाल्यानंतर मी पत्रकार परिषद घेईन आणि माझी भूमिका मांडेन. मी जेव्हा समाजाची भूमिका मांडेन तेव्हा कुणीही माझं-तुझं करू नका. मराठा समाजाला न्याय केंद्राने द्यायचा की राज्याने द्यायाचा हा प्रश्न नंतरचा आहे. आधी मार्ग काय काढणार ते सांगा असंही संभाजीराजेंनी सांगितलं.

मागच्या सरकारने दिलेलं आरक्षण बोगस होतं का? या सरकारने नीट प्रयत्न केले नाहीत का? या सगळ्या प्रश्नांमध्ये आणि भूतकाळात आम्हाला काहीही स्वारस्य नाही काय मार्ग काढू शकता ते सांगा असंही छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.

27 तारखेपर्यंत मराठा समाजाने संयम बाळगावा,  संभाजीराजे छत्रपती आवाहन
फडणवीसांनी दिलेलं मराठा आरक्षण 'फुलप्रुफ' असतं तर राज्यपालांना भेटायची वेळ आली नसती-उद्धव ठाकरे

सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर मी हे पाहिलं की विरोधी पक्षातले लोक राज्य सरकारवर टीका करू लागले. राज्य सरकार हे विरोधी पक्षावर टीका करू लागला. कुणी म्हणतं ही राज्याची जबाबदारी आहे कुणी म्हणतं ही केंद्राची जबाबदारी आहे. तुम्ही मार्ग काय काढणार ते सांगा मराठा समाजाला बाकी कशाशी घेणंदेणं नाही. माझ्या भूमिकेवर काही जण शंका घेत होते त्यांना हे सांगू इच्छितो की मला कुणीही आंदोलन काय असतं शिकवण्याची गरज नाही. मी जे बोलतो ते करून दाखवतो.

27 तारखेपर्यंत मराठा समाजाने संयम बाळगावा,  संभाजीराजे छत्रपती आवाहन
मराठा आरक्षण रद्द, जाणून घ्या खासदार संभाजीराजे यांची नेमकी प्रतिक्रिया

मराठा समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी मी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे त्यामुळे मला कुणीही शिकवण्याची गरज नाही. 2014 ला काही लोक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की तुमच्या नेतृत्त्वात आपण आंदोलन करू, त्यावेळी या वल्गना करणारे लोक आता कुठे आहेत? माझी स्पष्ट भूमिका आहे की मी शांत असलो तरीही गप्प बसलेलो नाही. आपले लोक कोरोनामुळे मरू नयेत याची काळजी मला वाटते आहे म्हणून मी गप्प बसलो आहे. शाहू महाराजांच्या काळातही जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा त्यांनी शांततेची भूमिका घेतली होती. तशीच भूमिका मी आत्ता घेतली आहे. मी वेळ आल्यावर आक्रमक होईन ते कधी व्हायचं हे मला सांगण्याची किंवा शिकवण्याची आवश्यकता नाही. प्रश्न माझ्या आक्रमकतेचाही नाहीच तुम्ही यातून नेमका मार्ग काय काढणार आहात ते आधी सांगा..असंही छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जे या सगळ्यातले तज्ज्ञ आहेत त्यांना मी भेटतो आहेत. आज नाशिकला त्याचसाठी आलो होतो. उद्या सोलापूरलाही जाणार आहे. 27 तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना भेटणार आहे त्यानंतर माझी भूमिका मांडायची आहे. त्यानंतर मी माझी भूमिका मांडणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in