Maratha Reservation: ‘पंतप्रधान मोदींनी छत्रपती संभाजीराजेंना चर्चेसाठी वेळ का दिली नाही?’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठा आरक्षणावरील चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीराजेंना चर्चेसाठी वेळ का दिली नाही? असा प्रश्न आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याचा अधिकार जर पंतप्रधानांना असेल तर वर्षभरापासून छत्रपती संभाजीराजे हे वेळ मागत आहेत. त्यांना वेळ पंतप्रधानांनी का दिला नाही असा प्रश्न आता संजय राऊत यांनी विचारला आहे. गुरूवारी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात न टिकणं हे ठाकरे सरकारचं अपयश-चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षण हे मराठा समाजाला हवं आहेच. त्यामुळेच विधानसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र आलं पाहिजे. आम्ही पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे जायला तयरा आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आमच्यासोबत यावं. त्यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मराठा आरक्षण हा पेटवापेटवीचा विषय नाही

मराठा आरक्षण हा राजकारण करण्याचा आणि पेटवापेटवी करण्याचा विषय नाही. हे राज्यातील विरोधकांनी नीट समजून घेतली पाहिजे. शाहबानो प्रकरण, अॅट्रॉसिटी कायदा, 370 कलम रद्द करणे याविषयी केंद्र सरकारने तत्परता दाखवून जी न्यायप्रियता दाखवली प्रसंगी घटनेतही बदल केले. तशाच गतीने आता केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अशाच गतीने केंद्र सरकार सोडवेल अशी अपेक्षा आम्ही बाळगली तर त्यात गैर काय? राजकीय टोलेबाजी बाजूला ठेवून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची ही लढाई महाराष्ट्राने सावध पावलं टाकून जिंकली पाहिजे असंही शिवसेनेने म्हटलं आहे. सामनाच्या अग्रलेखात मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारसह विरोधकांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

फडणवीस सरकारने दिलेलं मराठा आरक्षण ठाकरे सरकारला टिकवता आलं नाही-शेलार

ADVERTISEMENT

बुधवारी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून विविध निराशाजनक प्रतिक्रिया येत आहेत. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनीही हा निर्णय दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. आता आज संजय राऊत यानी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेसाठी वेळ मागितली होती मात्र ती त्यांनी का दिली नाही? वर्षभर ते वेळ मागत आहेत तरीही त्यांना वेळ का दिली नाही? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT