Congress ने पंजाबमध्ये मुख्यमंत्री म्हणून दलित चेहरा का निवडला? काय आहे कारण?

असं म्हटलं जातं आहे की हा काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक आहे.. मात्र प्रचंड गुंतागुंत असलेला..
Congress ने पंजाबमध्ये मुख्यमंत्री म्हणून दलित चेहरा का निवडला? काय आहे कारण?

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीतसिंग चन्नी यांची निवड करण्यास नवज्योत सिंग सिद्धू यांना साडेतीन तास लागले. निर्णय घेण्यासाठी लागलेला विलंब, राजकीय गणितं या सगळ्या गोष्टी पंजाबमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसने दलित चेहरा निवडणं हे काँग्रेसला उशिराने सुचलेलं शहाणपण आहे. काहीजण याकडे मास्टरस्ट्रोक म्हणून पाहात आहेत. मात्र हा मास्टर स्ट्रोक असेल तर सरळसोट नाही प्रचंड गुंतागुंतीचा आहे.

पंजाबचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हरिश रावत यांनी ट्विटरवरून संध्याकाळी 5.36 ला चरणजीत सिंग चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. त्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी रात्री 8.56 ला ऐतिहासिक निर्णय म्हणत या ट्विटला उत्तर दिलं.

महत्त्वाची बाब ही आहे की सिद्धू यांचं हे वक्तव्य काही वेळातच आलं. पंजाब काँग्रेसचे प्रभारी यांनी हे जाहीर केलं की पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका या नवज्योत सिंग सिद्धू यांना समोर ठेवूनच लढल्या जातील. कारण नवज्योत सिंग सिद्धू खूप लोकप्रिय आहेत.

काँग्रेससाठी पुढील चित्र आशादायी आहे असं म्हणता येईल कारण प्रतिस्पर्धी शिरोमणी अकाली दल, बहुजन समाज पार्टी यांची युती आहे. तसंच आम आदमी पार्टी आणि भाजप यांची पंजाबमध्ये ताकद किती आहे याची चाचपणी काँग्रेसने केली आहे.

त्यामुळे आगामी निवडणूक ही सिद्धू यांच्या नेतृत्वात लढली जाईल, त्यांचा चेहरा समोर ठेवून लढली जाईल हे स्पष्ट आहे. 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर सिद्धू हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत हे उघड आहे.

सध्याच्या घडीला काँग्रेसने चरणजीत सिंग चन्नी हा दलित चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी निवडणं हे काँग्रेस पक्षाच्या हिताचं आहे. त्यांना बदललं तर पंजाबमधला वाद हा अशोक गेहलोत-सचिन पायलट, टीएस सिंहदेव विरूद्ध भुपेश बघेल यांच्या वादांपेक्षा मोठा होईल. त्यांना बदलणं हे काँग्रेससाठी अहिताचं ठरणार आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांच्या चेहऱ्याला पहिली पसंती नव्हती. राहुल गांधी यांनी अंबिका सोनी यांना हे पद देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र पंजाबमध्ये माझ्याऐवजी पगडीधारी शिख मुख्यमंत्री असावा असा आग्रह अंबिका सोनी यांनी धरला म्हणून त्यांनी समोर आलेली संधी नाकारली.

खरंतर अंबिका सोनी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार हे निश्चित होतं. त्यावेळी कुणीही काहीही बोललं नाही. मात्र त्यांनी हे पद नाकारलं इथे ही बाबही लक्षात घेतली पाहिजे की अंबिका सोनी यांनी सोनिया गांधींना 2019 मध्ये एक ईमेल केला होता आणि त्याद्वारे सक्रिय राजकारणातून मला निवृत्त करा अशी मागणी केली होती. सोनिया गांधी यांनी या मेलला तातडीने उत्तर दिले नाही. पण नोव्हेंबर 2020 पासून G-23 मधील मतभेदांवर लक्ष ठेवण्यात सांगितलं. अंबिका सोनी, दिग्विजय सिंग आणि वीरप्पा मोईली हे काँग्रेस परिवारतले जुने जाणते मानले जातात.

काँग्रेसचं लक्ष आता माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे आणि त्यांच्या पुढील वाटचालीवर आहे. काँग्रेसच्या मते अमरिंदर यांना असं वाटत होतं की आपल्यानंतर आपला उत्तराधिकारी म्हणून नवजोत सिंग सिद्धू यांची निवड होईल. गेल्या दोन महिन्यात सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी मोठी खेळी खेळली. त्यांना 50 हून जास्त आमदारांनी पाठिंबाही दिला.

मात्र अमरिंदर यांनी राजीनामा देताच सिद्धू यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आलं तर मी कडाडून विरोध करेन कारण त्यांचे संबंध पाकिस्तानशी आहेत असं वक्तव्य केलं. ज्यानंतर काँग्रेसने आमदारांची सकाळी 11 वाजता होणारी बैठकही रद्द केली. त्यानंतर काँग्रेसने सिद्धू यांचं नाव वगळून इतर पर्यायी नावांचा विचार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ही निवड झाली आहे.

दुसरीकडे पंजाब काँग्रेसमध्ये असं मानणाराही एक वर्ग आहे ज्या वर्गाला हे वाटतं आहे की येत्या काळात सिद्धू यांना टक्कर देऊ शकतील अमरिंदर सिंगच. सिद्धू यांना त्यांच्या पाठिंबा वाढवावा लागणार आहे. तो वाढवण्याच्या आत पंजाबच्या निवडणुका जाहीर झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे सध्या काँग्रेसने मुख्यमंत्रीपदी दलित चेहरा निवडला असला तरीही त्यामागे गुंतागुंतीची खेळी आहे हेच दिसतं आहे.

Related Stories

No stories found.