'मुंबईसाठी Global Tender च्या माध्यमातून एक कोटी Vaccines मागवणार'

मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी दिली माहिती
'मुंबईसाठी Global Tender च्या माध्यमातून एक कोटी Vaccines मागवणार'

मुंबईसाठी Global Tender च्या माध्यमातून एक कोटी लसी मागवणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनंतर ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून आम्ही 1 कोटी लसी मुंबईसाठी उपलब्ध करणार आहोत. जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर लसी मागवण्यात येतील. कोरोनाशी लढा देण्यासाठी जास्तीत जास्त मुंबईकरांचं लसीकरण होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे असंही चहल यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर भविष्यासाठी लसींची तरतूद करण्यावर आम्ही भर देत आहोत. पुढील 60 ते 90 दिवसात लसीकरणासाठी पात्र असलेल्या सगळ्यांना लस देण्याचं लक्ष्य आम्ही ठेवलं आहे असंही चहल यांनी स्पष्ट केलं.

'मुंबईसाठी Global Tender च्या माध्यमातून एक कोटी Vaccines मागवणार'
सुप्रीम कोर्टाने गौरवलेलं मुंबईचं 'ऑक्सिजन मॉडेल' आहे तरी काय? वाचा सविस्तर

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. महाराष्ट्रातल्याही अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना आटोक्यात येतो आहे. कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होते आहे. अॅक्टिव्ह रूग्णांची संख्याही ७ लाखांपर्यंत पोहचली होती ती आता पाच ते साडेपाच लाखांच्या घरात आहे. तरीही महाराष्ट्रातला लॉकडाऊन पंधरा दिवसांनी वाढेल असे संकेत आजच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री येत्या दोन-तीन दिवसांमध्ये याबद्दल निर्णय घेतील असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुणे मॉडेलचं कौतुक हे केंद्र सरकारनेही केलं आहे.

'मुंबईसाठी Global Tender च्या माध्यमातून एक कोटी Vaccines मागवणार'
महाराष्ट्रात Lockdown वाढणार, 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण तूर्तास स्थगित-राजेश टोपे

मुंबई मॉडेलबाबत केंद्र सरकारने काय म्हटलं आहे?

मुंबई हे खूप मोठं शहर आहे, मात्र कोरोना रूग्ण हाताळणीसाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने काही महत्त्वाची पावलं उचलली. हॉस्पिटल्समधली तयारी, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनची तयारी या सगळ्या गोष्टी अत्यंत योग्य पद्धतीने उपलब्ध केल्या. कोरोना आटोक्यात येण्यासाठी मुंबईतल्या 24 वॉर्डांमध्ये 24 कंट्रोल रूम तयार कऱण्यात आले. त्यानंतर टेस्टचे निकाल जेव्हा यायचे तेव्हा त्याची वॉर्ड प्रमाणे विभागणी करण्यात आली. हे अहवाल त्या त्या वॉर्डाच्या कंट्रोल रूमकडे धाडण्यात आले. या कंट्रोल रूममध्ये टेलिफोन ऑपरेटर्स, डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, अँब्युलन्स या सगळ्या सेवा उपलब्ध करण्यात आल्या. कुठल्या वॉर्डातले लोक पॉझिटिव्ह आले आहेत ते माहित करून घेऊन त्या लोकांना रूग्णालयात पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली. एक आयटी प्लॅटफॉर्म तयार केला गेला. एक डॅशबोर्ड तयार कऱण्यात आला त्यावर रूग्णालयातल्या बेड्सची उपलब्धता टाकण्यात आली. कोणत्याही रूग्णाला बेड हवा असताना कसा मिळू शकेल याची योग्य पद्धतीने काळजी घेण्यात आली. या प्रकारे योग्य प्लानिंग केल्याने मुंबईतही कोरोना संख्या कंट्रोलमध्ये आली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in