Sharad Pawar आणि Prashant Kishor यांच्यात बंद दाराआड चर्चा, राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्यात थोड्याच वेळापूर्वी एक बैठक सुरु झाली असल्याची माहिती समोर आली आहे. साधारण 10 दिवसात या दोघांमधील ही दुसरी भेट आहे. मात्र आजची भेट ही राजधानी दिल्लीत (Delhi) होत आहे.

दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या 6 जनपथ निवासस्थानी जाऊन प्रशांत किशोर यांनी त्यांची भेट घेतली आहे. याआधी 11 जून रोजी मुंबईत येऊन प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.

यावेळी त्यांनी माध्यमांना असं सांगितलं होतं की, ही भेट फक्त सदिच्छा भेट आहे. सुप्रिया सुळेंनी मला जेवणासाठी निमंत्रण दिलं होतं. म्हणून मी इथे आलो आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मात्र आता, पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या विजयात प्रशांत किशोर यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आता प्रशांत किशोर यांना हाताशी धरुन राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राजकारणात काही नवी समीकरणं रचण्याचा प्रयत्न करत आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

Prashant Kishor आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राला झाली चार राजकीय भेटींची आठवण

ADVERTISEMENT

राष्ट्रपती निवडणुकीबाबत होणार चर्चा?

दरम्यान, राष्ट्रपती निवडणूक देखील आता लवकरच होणार आहे अशावेळी याबाबत देखील आजच्या बैठकीत काही नवे मुद्दे मांडले जाऊ शकतात. पुढील वर्षभरातच राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे ती वेगवेगळ्या पक्षाच्या पाठिंब्यावर आपण एकत्र लढवू शकतो का? याविषयी देखील या पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात चर्चा होऊ शकते किंवा त्याबाबत चाचपणी केली जाऊ शकते.

कारण राष्ट्रपती निवडणुकीत राज्यांचंही महत्त्व अधिक आहे. या सगळ्या अनुषंगाने शरद पवार हे प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा करु शकतात.

Prashant Kishor आणि शरद पवार यांच्या भेटीमागचं नेमकं कारण आहे तरी काय?

दरम्यान, 10 दिवसातच पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दुसरी भेट होत आहे. या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

मात्र, आता अशी माहिती समजते आहे की, बंगाल निवडणुकीनंतर जे छोटे राजकीय पक्ष आहेत त्यांना एकत्र घेऊन जर काही आघाडी करता आली आणि भाजपला आपण काही टक्कर देऊ शकलो तर त्यानिमित्ताने त्यांचे हे प्रयत्न चालू आहेत. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते आणि त्यामुळेच ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चिंता नाही-शरद पवार

नव्या आघाडीसाठी शरद पवार करणार प्रयत्न?

प्रशांत किशोर हे राष्ट्रीय स्तरावर काही आघाडीचं राजकारण करता येईल का? याची चाचपणी करत आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी संकल्पना मांडली होती की, महाआघाडी करुन भाजपशी लढावं. अशा परिस्थितीत त्या-त्या राज्यामध्ये जर भाजपच्या तिकडच्या पक्षांशी आघाडी करता आली पाहिजे असं सूत्र शरद पवारांनी त्यावेळी मांडलं होतं.

मात्र, पवारांनी जे सूत्र मांडलं होतं त्यापद्धतीने आघाडी काही होऊ शकली नव्हती. अशावेळी आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रशांत किशोर हे नव्या पद्धतीने आणि आपल्या मार्गाने राष्ट्रीय स्तरावर काही नव्या गोष्टी करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आजची ही बैठक खूप महत्त्वाची मानली जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT