रक्तपाताशिवाय शीतयुद्धाचा अंत करणारे, नोबेल विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रक्तपाताशिवाय शीतयुद्धाचा अंत करणारे आणि सोव्हियत युनियनचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं निधन झालं आहे. मॉस्कोतल्या रूग्णालयाने मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं निधन झाल्याची बातमी दिली आहे. सोव्हियत युनियन आणि अमेरिका या दोन बलाढ्या राष्ट्रांमध्ये वर्चस्वासाठी मोठा संघर्ष निर्माण झाला होता. या दोन राष्ट्रांनी एकमेकांवर हल्ले केले असते तर तिसऱं महायुद्ध झालं असतं. मिखाईल गोर्बाचेव्ह यांना कोणताही रक्तपात होऊ न देता त्यांनी शीतयुद्धातून बाहेर काढलं होतं.

गोर्बाचेव्ह यांचं वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झालं. गोर्बाचेवह् यांनी शीतयुद्ध थांबवलं मात्र सोव्हियत युनियनचं विभाजन ते थांबवू शकले नाहीत. मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म २ मार्च १९३१ ला एका गरीब कुटुंबात झाला होता. स्टॅलिन यांच्या शासन काळाते लहानाचे मोठे झाले. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या ताब्यात राज्यं गेल्यास काय होतं ते त्यांनी पाहिलं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर गोर्बाचेव्ह यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर साम्यवादी पक्षाद्वारे आपली कारकीर्द घडवली.

१९८५ मध्ये गोर्बाचेव्ह यांना सोव्हियत संघाचा नेता म्हणून निवडण्यात आलं होतं. १९८५ ते १९९१ या काळात मिखाईल गोर्बाचेव्ह हे सोव्हियत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते. १९९० मध्ये नोबेल समितीने गोर्बाचेव्ह यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्रदान केला होता. संघर्षाऐवजी चर्चा झाल्या, त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेच्या देशांमधल्या परस्पर संबंधांमध्ये कमालीचं परिवर्तन झालं. हत्यार, शस्त्रं यांची जागा निःशस्त्रीकरणाने घेतली. त्यामुळे अनेक देशांमधले संघर्ष आणि भिजत पडलेले प्रश्न निकाली निघाले. हे उद्गार नोबेल समितीने मिखाईल गोर्बाचेव्ह यांना नोबेल पुरस्कार देताना काढले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोव्हियत संघाचं विभाजन रोखू शकले नाहीत गोर्बाचेव्ह

असं सगळं असलं तरीही सोव्हियत संघाचं विभाजन गोर्बाचेव्ह रोखू शकले नाहीत. २५ डिसेंबर १९९१ ला टीव्हीवर प्रसारित केलेल्या एका संदेशात आपण राजीनामा देत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. एवढंच नाही तर सोव्हिएत संघाचं विभाजन रोखण्यात आपल्याला अपयश आलं हे म्हणत त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT