'दुकानांवरच्या पाट्या मराठीत करण्यासाठी सरकारने खर्च द्यावा, मी उभं राहून..' -इम्तियाज जलील

जाणून घ्या इम्तियाज जलील यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
'दुकानांवरच्या पाट्या मराठीत करण्यासाठी सरकारने खर्च द्यावा, मी उभं राहून..' -इम्तियाज जलील

महाराष्ट्रातील सर्व दुकानांच्या आणि आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात्या या कायद्यात सरकारने दोन दिवसांपूर्वीच बदल केला. सरकारने मराठी भाषेत बोर्ड असला पाहिजे जेवढं मोठं इंग्रजी नाव तेवढ्याच आकारात मराठी नाव असलं पाहिजे असा महत्त्वाचा बदल या मराठी पाट्यांच्या बाबतीत केला आहे. त्यानंतर आता यावरून राजकारण रंगू लागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करत हे सगळं श्रेय मनसैनिकांचं आहे असं म्हटलं आहे. कुणीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे वरून आक्रमक झाले आहेत.

'दुकानांवरच्या पाट्या मराठीत करण्यासाठी सरकारने खर्च द्यावा, मी उभं राहून..' -इम्तियाज जलील
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं उद्धव ठाकरेंचं अभिनंदन, म्हणाले....

काय म्हणाले आहेत इम्तियाज जलील?

'मागच्या दोन वर्षांपासून सगळ्याच कारभारांमध्ये, उद्योग व्यवसांमध्ये मंदी आहे. कारण आहे कोरोनाचं. कोरोनामुळे अनेक दुकानदार त्रस्त झाले आहेत. अनेकजण तोट्यात आहेत. या दुकानदारांचं भविष्यही अंधारात आहे. उद्या आम्ही दुकानं उघडू शकणार की लॉकडाऊन लागणार? अशी अनिश्चितता दुकानदारांना सतावते आहे. अशी अनिश्चितता असताना सरकार हे सांगत असेल की आपल्याला दुकानांवरच्या पाट्या मराठीत करायच्या आहेत आणि आम्ही निर्णय घेतला आहे. तर माझं हे म्हणणं आहे की सरकारने यासाठीचा खर्च करावा. सरकारला मराठीवर प्रेम आहे ना मग त्यांनी जेवढी दुकानं आहेत त्या दुकानांच्या पाट्या तुम्ही सरकारी खर्चातून मराठीमधे करा. मी उभं राहून सगळ्या पाट्या मराठीतून करून घेण्याची जबाबदारी घेतो. मराठी ठामपणे दिसेल याचीही काळजी आम्ही घेऊ'

मनसेलाही केलं आवाहन

'जे लोक मराठीच्या बाबतीत हे सांगत आहेत की जे दुकानदार पाटी बदलणार नाहीत तिकडे आम्ही तोडफोड करू त्यांनाही माझं हात जोडून सांगणं आहे की तुमच्याकडे खूप पैसे आहेत. मराठीवर तुमचं खूप प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या खिशातल्या पैशातून दुकानदारांचे बोर्ड मराठी भाषेत करून द्या. फक्त मराठीवरच्या प्रेमाच्या गप्पा मारू नका. गरीब दुकानदाराला त्याचा बोर्ड बदलण्यासाठी अडीच तीन हजार खर्च येतो. मोठ्या दुकानादारांना पाच हजार आणि त्यापुढील रक्कम लागू शकते. या सगळ्याचा खर्च तुम्ही तुमच्या पैशातून करा' असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

'दुकानांवरच्या पाट्या मराठीत करण्यासाठी सरकारने खर्च द्यावा, मी उभं राहून..' -इम्तियाज जलील
दुकानांच्या पाट्या आता मराठीतच! ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

12 जानेवारीला काय निर्णय झाला?

मुंबईतसह राज्यभरात मराठी वाचवा ही मोहीम सुरू असताना आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी होत असताना दुकानांवरच्या पाट्या मराठीत नसत. राज्यातील सर्व दुकानांवर मराठी भाषेतल्या पाट्या असाव्यात असा नियमही सरकारने केला होता. मात्र त्याची अमलबजावणी म्हणावी तशी झाली नव्हती. दुकानदार काही ना काही पळवाटा शोधून या नियमाला बगल द्यायचे. मात्र आता राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. दुकानांवरच्या पाट्या आता मराठीतच करण्याचा हा निर्णय आहे.

राज्यातील सर्व दुकानांवर मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. त्यानंतर याची अंमलबजावणी होत नव्हती. अनेक ठिकाणी इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात नाव असायचं. मराठीत मात्र लहान अक्षरात नावं असायची. आजच्या निर्णयाने इतर भाषेच्या प्रमाणे मराठीतील नावही तेवढच मोठं ठेवावं लागणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.

राज्य सरकारच्या याच निर्णय़ावरून आता शिवसेना आणि मनसे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठी पाट्यांचा खर्च सरकारने करावा असं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in