'या' मंत्र्याने वेष बदलून शहरात केली छापेमारी, पाहा त्यांच्या जाळ्यात कोण-कोण सापडलं

Minister Bachchu Kadu raided: मंत्री बच्चू कडू यांनी वेष बदलून अकोला शहरात अनेक ठिकाणी छापेमारी केली. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण काय आहे.
बच्चू कडू यांनी वेष बदलून केली छापेमारी
बच्चू कडू यांनी वेष बदलून केली छापेमारी

अकोला: राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) हे नेहमी धडकेबाज कारवाई करण्यासाठी ओळखले जातात. अगदी आमदार असल्यापासून ते आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे काम असल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. एवढंच नव्हे तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांनी अनेकदा हातही उचलला असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका वेगळ्याच स्टाईलने कारवाई केली.

अकोला जिल्ह्यात सरकारी अधिकारी कशा पद्धतीने काम करत आहेत आणि कशा अवैध पद्धतीने इथे गुटख्याची विक्री केली जात आहे या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी बच्चू कडू यांनी चक्क वेष बदलून शहरात फेरफटका मारला. (Bachchu Kadu raided in disguise)

अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे युसूफ खान पठाण ताबीज असा वेष धारण करुन सर्वात आधी शहरातील महानगरपालितेली आयुक्तांच्या कार्यालयात पोहचले. पण आयुक्त आपल्या चेंबरमध्ये नसल्याने त्यांनी आपला मोर्चा सरकारी रेशन दुकानाकडे वळवला.

यावेळी त्यांनी रेशन दुकानदाराकडे अवैध पद्धतीने रेशनची मागणी केली. पण त्यांना तशा पद्धतीने रेशन काही देण्यात आलं नाही. त्यामुळे ते तहसील कार्यालयात पोहचले. तिथे त्यांनी पैसे देऊन रेशनकार्ड बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे देखील त्यांना काही गडबड दिसून आली नाही.

बच्चू कडू यांनी वेष बदलून केली छापेमारी
...अन् राज्यमंत्री बच्चू कडूंनी आचाऱ्याच्या कानशिलात लगावली, Video व्हायरल

यानंतर बच्चू कडू हे विदर्भ कोकण बँकेच्या मॅनेजरकडे गेले. यावेळी त्यांनी बँकेच्या मॅनेजरकडे कर्जाची मागणी केली आणि मॅनेजरला लाच देण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण आमच्या बँकेत असं काही होत नाही असं सांगून त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या कागदपत्रांची मागणी केली. या सगळ्या प्रकारानंतर बच्चू कडू यांनी समाधानाने शहरातील पान विक्रेत्यांकडे आपल्या मोर्चा वळवला.

यावेळी शहरातील पान विक्रेते हे अवैध पद्धतीने गुटखा विक्री करत असल्याचं आढळून आल्याने त्यांनी त्यांच्यावर छापेमारी केली. यावेळी त्यांनी हजारो रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. दरम्यान, अशी छापेमारी होत असल्याचं समजताच पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना देखील आश्चर्याचा धक्काचा बसला.

कारण त्या ठिकाणी स्वत: राज्यमंत्री बच्चू कडू हे वेष बदलून आले होते. यामुळे अधिकाऱ्यांची देखील बोलती बंद झाली.

दरम्यान, लॉकडाऊन असताना देखील अशाच प्रकारे वेष बदलून बच्चू कडू यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये जाण्यासाठी पोलिसांची हुज्जत घातल्याचं समोर आलं होतं.

बच्चू कडू यांनी वेष बदलून केली छापेमारी
'मटणवाले चाचा' बनून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली पोलिसांची 'शाळा'

शहरात आणि जिल्ह्यात सरकारी कामकाज नेमकं कसं चाललं आहे आणि कुठे-कुठे भष्ट्राचार बोकाळला आहे हे पाहण्यासाठी बच्चू कडू यांनी वेष बदलून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान, त्यांनी केलेल्या या कारवाईत अन्न आणि प्रशासन गुटखा माफियांना पाठिशी घालत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आता अशा अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in