मंत्री Sanjay Rathod नव्या वादात, पुन्हा द्यावा लागणार राजीनामा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Corruption allegations against Ekanth Shinde's minister sanjay Rathod by chemist association
Corruption allegations against Ekanth Shinde's minister sanjay Rathod by chemist association
social share
google news

Minister Sanjay Rathod serious allegations Gairan land allotment case: मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी गायरान जमीन वाटप आणि अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे टार्गेट दिले असल्याचे आरोप विरोधकांनी सभागृहात केले आहेत. याच आरोपावरुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच आता शिंदे सरकारला दुसरा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण शिंदे सरकारमधील अन्न व प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या देखील गायरान जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत विरोधकांनी आरोप केले आहेत. (minister sanjay rathod in new controversy is also coming to the fore in the gairan land allotment case)

संजय राठोड यांनी गायरान जमीन खासगी विकासकाला दिल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला आहे. फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री असताना 29 जुलै 2019 संजय राठोड यांनी काढलेल्या एका शासकीय आदेशाचा हवाला देत हा सगळा घोटाळा झाला आहे असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी शिंदे गटातील दोन मंत्र्यांवर एकाच प्रकारचे आरोप झाल्याने ऐन अधिवेशनाच्या काळात सरकारवर मोठी नामुष्की ओढावली आहे. यामुळे आता अब्दुल सत्तार आणि त्यांच्यानंतर संजय राठोड हे सुद्धा विरोधकांच्या निशाण्यावर आलेले आहेत. तब्बल 37 कोटींची गायरान जमीन असलेल्या या प्लॉटबाबत मंत्री संजय राठोड यांनी घोटाळा केल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अब्दुल सत्तार गोत्यात; कोर्टाचे ताशेरे, अधिवेशनात गाजणार ‘जमीन घोटाळा’

या सगळ्या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून अब्दुल सत्तारांनंतर संजय राठोड यांच्या देखील राजीनाम्याची मागणी विरोधक सभागृहात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सरकारला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

ADVERTISEMENT

संजय राठोडांनी आदेश दिलेलं गायरान जमिनीचं नेमकं प्रकरण काय?

संजय राठोड हे महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील सावरगाव येथील एका व्यक्तीला 29 जुलै 2019 रोजी गायरान जमीन देण्याचा आदेश काढला होता. पण आता हीच बाब समोर आली आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे वेळोवेळी आदेश आहेत की, अशाप्रकारे गायरान जमिनी आहेत ते देण्यात येऊ नये.

ADVERTISEMENT

त्यावेळी वाशिमच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मंगरुळपीरच्या तत्कालीन तहसीलदारांनी ही जमीन खासगी व्यक्तीला देता येणार नाही असे आदेश दिलेले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले हे आदेश मंत्री संजय राठोड यांनी 2018 साली रद्द ठरवले होते.

हे आदेश रद्द करुन संजय राठोड यांनी संबंधित जागा नियमित करण्याची कार्यवाही एक महिन्याच्या आत करावी असे नवे आदेश दिलेले. ज्यानंतर 29 जुलै 2019 जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात संबंधित जमीन एका खासगी विकासाला दिल्याचं समोर आलं.

मात्र, आता गायरान जमीन वाटपाबाबत संजय राठोड हे पुन्हा एकदा वादात सापडले असून आता सरकारकडून याबाबत नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Abdul Sattar : नॉट रिचेबल सत्तार सापडले! निकटवर्तीयाकडून पाठवला मेसेज

अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याचीही मागणी

एकीकडे काल अब्दुल सत्तार यांच्यावर अशाच स्वरुपाचे आरोप झाले होते. त्यामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेत त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला होता.

या सगळ्या आरोपांबाबत अब्दुल सत्तार हे आज विधानसभेत उत्तर देणार आहेत. असं असताना आता अशाच स्वरुपाचे आरोप संजय राठोड यांच्यावर झाले असल्याने शिंदे सरकार अडचणीत आलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT