कल्याणमधील संतापजनक घटना! 2 वर्षांपासून बाप आणि भाऊच करत होते बलात्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बहीण-भाऊ आणि बाप-मुलीच्या नात्याला नात्याला काळीमा फासत दोन नराधमांनी 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बाप आणि मुलावर बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

16 वर्षाच्या मुलीवर बाप आणि भाऊच लैगिंक अत्याचार करत असल्याची माहिती मुलीने शाळेतील शिक्षकेला आणि मुख्यध्यापकांना दिली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

मागील दोन वर्षांपासून वडील आणि भाऊ मुलीवर अत्याचार करत असल्याचं ऐकून शिक्षकांनाही धक्का बसला. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीने तिच्यासोबत दोन वर्षांपासून होत असलेल्या अत्याचारांची आपबीती पोलिसांना सांगितली. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोक्सो कायद्यांतर्गत वडील आणि भावाविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

पीडित मुलगी आपल्या आणि भावासोबत कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तर पीडितेची आई आणि बहिणी उत्तर प्रदेशातील त्यांच्या गावी राहतात. पीडित मुलगी दहावीच्या वर्गात शिकते.

ADVERTISEMENT

पीडित मुलीच्या घरी काही मुले आली होती. त्यांच्यासाठी चहा केल्याच्या रागातून वडिलांनी मुलीला कपडे काढून मारहाण केली. त्यानंतर बाप आणि भावाकडून होत असलेल्या अत्याचाराची पीडितेने शाळेतील शिक्षिका आणि मुख्यध्यापकांना सांगितली.

ADVERTISEMENT

43 वर्षीय वडिलांनी आणि 20 वर्षीय भावाने विनयभंग करत अनेकवेळा बलात्कार केल्याचं पीडितेनं म्हटलं आहे. दोघेही पीडितेवर 2019 पासून अत्याचार करत होते. जानेवारी 2019 मध्ये पीडित मुलगी घरात एकटीच झोपलेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार केला. त्याच महिन्यात तिच्यावर भावानेही बलात्कार केला, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.

…अन् अत्याचाराला फुटली वाचा

दोन वर्षांपासून बाप आणि भावाकडून लैगिंक शोषण सुरू होतं. दरम्यान, आपल्याप्रमाणेच वडील आणि भाऊ आपल्या छोट्या बहिणीवरही अत्याचार करतील, या भीतीतून पीडित मुलीने याबद्दल बोलण्याचं ठरवलं आणि शाळेतील शिक्षिका आणि मुख्याध्यापकांना सांगितलं.

हे कळाल्यानंतर शिक्षिका आणि मुख्याध्यापकांनी स्वयंसेवी संस्थेशी संपर्क केला. एनजीओच्या कर्मचाऱ्यांनी तिचं समुपदेशन करून तक्रार करण्यास तयार केलं. त्यानंतर पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच वडील आणि भावाला पोलिसांनी शनिवारी अटक केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT