'नवरा नको वाटतो, तर ये माझ्याजवळ' म्हणून बापच छळायचा; दोघांनी जेवण देतो म्हणून केला बलात्कार

सामाजिक न्याय मंत्र्यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक घटना : पती, वडील, चुलते, भाऊ, नंणद यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Rape case
Rape case(प्रातिनिधिक फोटो)

-रोहिदास हातागळे

लहानपणी आईचे छत्र हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा बालविवाहसह तिचा अनेकांनी अत्याचार करून लैंगिक शोषण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात घडली असुन याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात पती, वडील, चुलते, भाऊ, नंणद यांच्यासह जेवायला देतो म्हणून बलात्कार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनं पुन्हा एकदा सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांचा बीड जिल्हा हादरला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळीच ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Rape case
भयंकर! 12 वर्षाच्या मुलीसह महिलेचा मृतदेह सापडला रक्ताच्या थारोळ्यात; पती फरार

अल्पवयीन मुलीने पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझे वडील व माझा भाऊ असे सोबत राहायचो. आईचा मी ८ वर्षाची असताना मृत्यू झालेला आहे. माझं ७ वीपर्यंतचे झालं आहे. मी मुलींच्या वसतिगृहात राहत होते. ७वी नंतर वडील मला गावी घेऊन गेले. त्यानंतर लगेच अंदाजे १९ मे २०१८ रोजी मी १३ वर्षाची असताना बळजबरीने लग्न लावून दिलं.

माझ्या लग्नाला नणंद सोनाली तसेच माझे वडील, भाऊ तसेच माझा मोठा चुलता, लहान चुलती यांच्यासह ब्राह्मण व इतर काही लोक हजर होते.

Rape case
जस्ट डायलचा वापर वेश्या व्यवसायासाठी ? स्पा, मसाजच्या चौकशीनंतर समोर आलं 150 मुलींचं 'रेटकार्ड'

लग्नानंतर मी, माझी आजेसासु असे अंबाजोगाई येथे राहत होतो. त्यावेळी माझा नवरा दुसऱ्या गावी कामाला जात होता व माझा नवरा अधूनमधुन धारुरवरुन यायचा, तेव्हा आमची जवळीक होत असे. माझा नवरा मला मारहाण देखील करायचा म्हणुन मी १४ जानेवारी २०१९ रोजी रागाच्या भरात माहेरी निघून आले. तेथे वडील व भाऊ यांच्याबरोबर राहु लागले.

मी माहेरी राहत असताना माझे वडील मला म्हणत असे की, 'तु तुझा नवरा सोडुन आमच्याकडे का राहायला आलीस? नवरा नको वाटतो, तर ये माझ्याजवळ' असं म्हणून शरीराला वाईट अर्थाने स्पर्श करायचे. मारहाण देखील करत होते म्हणून त्यांना कंटाळुन मी घरातुन निघून गेले. जून २०२१ पासून अंबाजोगाई येथील बसस्टॉप परिसरात वास्तव्यास असते.

Rape case
अकोला : अल्पवयीन मुलीसोबत मौलानाचे दुष्कर्म, पोलिसांनी केली अटक

मी एकटी असल्याचं बघून अंबाजोगाई येथील ज्ञानदीप अँकडमी येथील हरी व ऋषी यांनी १५ दिवसापुर्वी जेवायला देतो असं सांगत आडस रोडला मोकळ्या जागेत नेऊन माझ्यावर बलात्कार केला. आडस रोडच्या डाव्या बाजुला असलेल्या मोकळ्या प्लाटिंगमध्ये १५ दिवसापुर्वी हरी दराडे (रा. गावदंरा, ता. धारूर) व ऋषिकेश दत्तात्रय सांगळे (रा. चाडगाव ता. धारूर) यांनी माझ्यावर बलात्कार केला, अशी हादरवून टाकणारी आपबीती या पीडितेनं तक्रारीत नमूद केली आहे.

या अल्पवयीन मुलीची माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे, मानवलोक मनस्विनी प्रकल्पाचे बालाजी वाघमारे, शोभा किरवले यांना मिळताच त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर यांची भेट घेतली. भेटीनंतर नेरकर यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचनेसह तपास करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी ऋषिकेश सांगळे यास ज्ञानदीप अॅकडमी येथून अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in