MLC Election 2023 : ‘3 विरुद्ध 1’; विधान परिषद निकालात ‘मविआ’ची सरशी

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

MLC Election 2023 update :

मुंबई : तब्बल 30 तासांनंतर अमरावती विधान परिषद पदवीधर मतदारसंघाचा निकाल हाती आला. यात काँग्रेसच्या धीरज लिंगाडे यांनी बाजी मारली आहे. लिंगाडेंच्या विजयानंतर महाराष्ट्रात 5 जागांवर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. 5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीने, एका जागेवर भाजपने तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. (MLC Election 2023 update Mahavikas Aghadi has won 3 out of 5 seats, BJP has won one seat and independent has won one seat)

वाचा सविस्तर कुठे कुणी मारली बाजी?

1. कोकण शिक्षक :

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बाजी मारली आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. या निवडणुकीत एकूण 35 हजार 700 वैध मतं ठरली होती. यात म्हात्रेंना पहिल्या पसंतीची 20 हजार 648 मतं मिळाली. तर बाळाराम पाटील यांना अवघी 9 हजार 500 मतं मिळाली.

MLC Election Result: BJPने कोकणात मविआला लोळवलं, म्हात्रे ठरले जायंट किलर!

ADVERTISEMENT

2. नागपूर शिक्षक :

ADVERTISEMENT

विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी बाजी मारली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमधूनच काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांनी तब्बल 16 हजार 700 मतं घेतली. तर विद्यमान आमदार नागो गाणार यांना फक्त 8 हजार 211 हजार मतं मिळाली आहेत. सुधाकर अडबाले यांनी गाणारांपेक्षा दुप्पट मतं घेतली आहेत.

MLC Election Result: फडणवीस उतरले मैदानात, तरीही ‘मविआ’ने नागपूर मिळवलं!

3. औरंगाबाद शिक्षक :

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी नेते विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव केला आहे. विक्रम काळेंना 20 हजार 195 मतं मिळाली. तर भाजपच्या किरण पाटील यांना 13 हजार 570 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी भाजपच्या पाटलांपेक्षा अधिक म्हणजेच 13604 मतं मिळवली.

MLC Election Result: महाविकास आघाडीला मोठं यश, आणखी एक उमेदवार विजयी!

4. नाशिक पदवीधर :

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारली आहे. पाचव्या फेरी अखेर तांबे यांना तब्बल 68 हजार 999 मतं मिळाली तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं पडली. मतमोजणी संपल्यानंतर तांबेंनी तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी झाले. महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत विजयासाठीचा कोटा 58 हजार 310 होता. 

Satyjeet Tambe : ‘मविआ’चा ‘करेक्ट कार्यक्रम’; शुभांगी पाटलांच्या पदरी मोठा पराभव

5. अमरावीत पदवीधर :

विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी विजय संपादन केला आहे. ३० तासांच्या प्रदीर्घ मतमोजणीनंतर लिंगाडेंनी गुलाल उधळला. भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील  यांचा त्यांनी तब्बल 3 हजार 382 मतांनी पराभव केला. दुसऱ्या फेरीअखेर लिंगाडेंना 46 हजार 344 मतं तर पाटील यांना 42 हजार 962 मतं मिळाली.

Amravati MLC Election : धीरज लिंगाडेंनी ३० तासांनंतर उधळला गुलाल! भाजपला धक्का

    follow whatsapp

    ADVERTISEMENT