मनसैनिकांनी ठाण्यात पोलिसांसमोरच फोडली दहीहंडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विक्रांत चव्हाण, ठाणे

कृष्ण जन्माष्टमीच्या मुर्हतावर मनसेने (MNS) दहीहंडी (Dahi Handi) फोडून हा सण साजरा केला आहे. परंतु पोलिसांना व सरकारला पुन्हा आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करूच जणू असा इशाराच दिला आहे. अश्याच प्रतिक्रिया ठाणे मनसे पदाधिकारी दिल्या आहेत. ठाणे पोलिसांच्या (Thane Police) समोरच मनसेने दोन थरांची हंडी लावून, एका महिला कार्यकर्त्याने ही दहीहंडी फोडली आहे.

सरकारने महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव साजरे करण्यास निर्बंध घातले आहेत. मात्र मनसे दहीहंडी साजरी करणार या मतावर मनसेचे नेते अविनाश जाधव ठाम होते. ठाण्यात सकाळीच मनसेने दहीहंडीसाठी बांधलेला स्टेज देखील पोलिसांनी काढला होता. त्यानंतर अविनाश जाधव उपोषणाला बसले आणि त्यांना ताब्यात देखील घेतलं होतं. नंतर अविनाश जाधव यांची जामिनावर सुटकाही झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे सर्व नाट्य संपल्यानंतर अखेर ठाण्यात मध्यरात्री मनसेने पोलिसांसमोरच दहीहंडी फोडली आहे. यावेळी दहीहंडीसाठी आलेल्या गोविंदा पथकाला पोलिसांनी हुसकवून लावले. मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मध्यस्थी केल्यानंतर काही ठराविक गोविंदांना परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर मनसेने पोलिसांसमोरच दहीहंडी फोडली. त्यानंतर पोलिसांनी मनसेचे कार्यकर्ते आणि गोविंदा पथकांना ताब्यात घेतले.

हंडी फोडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. परंतु आता सकाळी मनसे कशाप्रकारे दहीहंडी उत्सव साजरा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ADVERTISEMENT

हजारो मनसैनिक ठाण्यात येणार, संदीप देशपांडेंचं सरकारला आव्हान

ADVERTISEMENT

मनसेचे मुंबईतील नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला तर थेट आव्हानच दिलं आहे. ‘मला समजलं की, आमच्या अविनाशला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोरोना फक्त आमचे हिंदूचे सण साजरा करताना आडवा येतो का?, वरुण देसाई आंदोलन करताना, भाजप नेते जन आशीर्वाद यात्रा काढतात तेव्हा कोरोनाचे निर्बंध नसतात. तर दही हंडीला निर्बंध का?’

‘दहीहंडी होणारच… राज ठाकरेंचा आदेश’, मनसे आक्रमक

‘माझं सरकारला थेट आव्हान आहे. उद्या आम्ही सगळे मनसैनिक ठाण्यात जाणार आहोत. काय कराल जेलमध्ये टाकाल ना? पण किती जणांना टाकणार? हजारो मनसैनिक उद्या ठाण्यात येतील. तुम्हाला जेलही कमी पडतील. त्यामुळे एक तर उद्या हंडी होईल किंवा आम्ही तुरुंगात जाऊ.’ असं म्हणत संदीप देशपांडे यांनी सरकारला थेट आव्हान दिलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT