Raj Thackeray स्वतःचं वर्तमानपत्र काढणार? मुलाखतीमध्ये मोठा दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

MNS Chief Raj Thackeray news :

मुंबई : मला माझं वर्तमानपत्र काढण्याची इच्छा आहे. माझ्या वडिलांनी आणि काकांनी अनेक मासिकांची परिस्थिती चांगली नसताना ‘मार्मिक’ काढलं होता. त्यामुळे मला वर्तमानपत्र काढून बघू असं वाटतं. काही तरी नवीन देईन मी, असं म्हणतं वर्तमान पत्र काढतं असल्याचं भाकीत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वर्तविलं. लोकमान्य सेवा संघ शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. (MNS Chief Raj Thackeray Express his wish to start own news paper)

स्वतःच वर्तमान पत्र काढण्याची इच्छा :

राज ठाकरे म्हणाले, मला स्वतःच वर्तमान पत्र काढायचं होतं. त्यासाठी खूप लोकांशी बोललो, पण या गोष्टी जाहिरातींवर अवलंबून असतात. सगळ्याच म्हणतं नाही पण अनेक वर्तमानपत्रांना जाहिराती मिळत नाहीत, मग ब्लॅकमेलिंग करायचं आणि त्यामधून जाहिराती मिळवायच्या हे सुरु असतं, त्यामुळे मी जावूदे असं म्हटलं होतं. पण मला माझं वर्तमानपत्र काढण्याची इच्छा आहे. माझ्या वडिलांनी आणि काकांनी अनेक मासिकांची परिस्थिती चांगली नसताना ‘मार्मिक’ काढलं होता. त्यामुळे मला असं वाटतं की, वर्तमानपत्र काढून तर बघू. काही नवीन देईन तर मी, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

महाराष्ट्राची परिस्थिती उत्तर-प्रदेश, बिहार सारखी होईल :

यावेळी बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे अशी परिस्थिती कधीच बघितली नाही. १९९५च्या अगोदरचा महाराष्ट्र आणि १९९५ नंतरचा महाराष्ट्र वेगळा आहे. राजकारण, समाजकारण बदललं. राजकाराचा ऱ्हास १९९५ नंतर सुरु झाला. त्यामुळे आज मध्यमवर्ग मुला-मुलींनी राजकारणात येण्याची गरज आहे. अन्यथा महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश, बिहारसारखी होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत जाणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका

शिवसेना, राणेंनंतर आता राज ठाकरे?

राजकारणात राजकीय पक्षांचे किंवा नेत्यांचे मुखपत्र म्हणून वर्तमानपत्र काढल्याची अनेक उदाहरण आहेत. यात महाराष्ट्रात शिवसेनेचे सामना हे मुखपत्र आहे तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ‘प्रहार’ हे वर्तमानपत्र मुखपत्र आहे. आता अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वर्तमानपत्र काढण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांचही नाव या पंगतीमध्ये येणार का? असा सवाल विचारला जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT