प्रांतिक अस्मितेचं महत्व तुम्ही समजू शकता - राज ठाकरेंकडून ममता दीदी, स्टॅलिन यांचं अभिनंदन - Mumbai Tak - mns chief raj thackrey congratulate mamta banerjee and mk stalin on their victories in election - MumbaiTAK
बातम्या

प्रांतिक अस्मितेचं महत्व तुम्ही समजू शकता – राज ठाकरेंकडून ममता दीदी, स्टॅलिन यांचं अभिनंदन

पश्चिम बंगालसह ५ राज्यांतील निवडणूकीची मतमोजणी आज पार पडत आहे. ज्यात आसाम चा अपवाद वगळता इतर सर्व राज्यांत स्थानिक पक्षांनी भाजपचं आव्हान मोडून काढत सत्तेच्या दिशेने आगेकूच केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी भाजपचं आव्हान मोडून काढत सलग तिसऱ्यांदा सत्तेच्या दिशेने आगेकूच केली आहे. या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ममता दीदींचं अभिनंदन करत […]

पश्चिम बंगालसह ५ राज्यांतील निवडणूकीची मतमोजणी आज पार पडत आहे. ज्यात आसाम चा अपवाद वगळता इतर सर्व राज्यांत स्थानिक पक्षांनी भाजपचं आव्हान मोडून काढत सत्तेच्या दिशेने आगेकूच केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी भाजपचं आव्हान मोडून काढत सलग तिसऱ्यांदा सत्तेच्या दिशेने आगेकूच केली आहे. या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ममता दीदींचं अभिनंदन करत राज्याची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मितेचं महत्व तूम्ही समजू शकता असं म्हटलं आहे.

ममता बॅनर्जींचं अभिनंदन करत असताना राज ठाकरे यांनी राज्यांच्या स्वायत्ततेसाठीचा आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी मी आशा करतो असं म्हटलं आहे. याचवेळी राज ठाकरे यांनी तामिळनाडूत विजय मिळवलेल्या द्रमुकच्या स्टॅलिन यांचंही अभिनंदन केलंय.

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही ममता दीदींचं कौतुक करत दीदी ओ दीदी…विजयाबद्दल बंगालच्या वाघिणीचं अभिनंदन अशा शब्दांत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

भाजपच्या नियोजनाचं कौतुक केलं पाहिजे. कोरोना काळ होता तरीही देशाचे पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी गेले. देशाचे गृहमंत्री गेले. हे सगळं कौतुकास्पद आहे. मात्र पश्चिम बंगाल जिंकणार ममता बॅनर्जीच. कदाचित बहुमत थोडंसं कमी होईल.. मात्र सत्ता ममतांचीच येईल याचा विश्वास आम्हाला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बंगालमध्ये गेले होते. भाजपला या सगळ्याचा नक्कीच फायदा होईल. संध्याकाळी जेव्हा संपूर्ण निकाल जेव्हा हाती येतील तेव्हा ममता बॅनर्जीच मुख्यमंत्री होतील याचा विश्वास वाटतो कारण बंगालमधून त्यांना हरवणं सोपं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × five =

तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं