'माझ्या प्रभागात सर्वाधिक मुस्लीम', लाऊडस्पीकरच्या आदेशावर राज ठाकरेंचा खंदा समर्थक संभ्रमात

राज ठाकरेंशी चर्चा करुन परिस्थितीचा अंदाज देणार, नाराज कार्यकर्त्यांशीही संवाद साधेन - वसंत मोरे
'माझ्या प्रभागात सर्वाधिक मुस्लीम', लाऊडस्पीकरच्या आदेशावर राज ठाकरेंचा खंदा समर्थक संभ्रमात

गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद आता संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. मशिदीबाहेरील भोंग्यांवर कारवाई झाली नाही तर त्यासमोर लाऊडस्पीकर लाऊन हनुमान चालीसा लावण्याचे आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकरर्त्यांना दिले. राज्यात राज ठाकरेंचा आदेश मानत काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावलीही. परंतू असं असतानाही राज ठाकरेंचा एक खंदा समर्थक या आदेशावरुन संभ्रमात पडला आहे.

पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमात बोलत असताना आपण दुविधेत असल्याचं मान्य करत राज ठाकरेंशी भेटून याबद्दल चर्चा करणार असल्याचं वसंत मोरेंनी सांगितलं. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानंतर नाराज झालेल्या दोन मुस्लीम मनसे पदाधिकाऱ्यांनी पुण्यात राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या नाराज कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधणार असल्याचंही वसंत मोरेंनी सांगितलं.

राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशावरुन मी जरी दुविधेत असलो तरीही मी त्यांची साथ सोडणार नाहीये. राज ठाकरेंसोबत गेली २७ वर्ष मी काम करतो आहे. या कारकिर्दीत मी १५ वर्ष नगरसेवक, एकवेळा गटनेता आणि शहराध्यक्ष म्हणून काम केलं आहे. प्रत्येकवेळी राज साहेबांचा आदेश मानत आंदोलनात सहभाग घेतला आहे आणि यापुढेही घेत राहीन. मी ज्या प्रभागाचा नगरसेवक आहे तिकडे मुस्लीम समाज सर्वाधीक आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये मत देऊन त्यांनी मला विजयी केलं आहे, असं म्हणत वसंत मोरे यांनी आपला संभ्रम बोलून दाखवला.

'माझ्या प्रभागात सर्वाधिक मुस्लीम', लाऊडस्पीकरच्या आदेशावर राज ठाकरेंचा खंदा समर्थक संभ्रमात
Raj Thackeray: राज ठाकरेंचं 'ते' वक्तव्य पक्षाला भोवणार?

सध्याच्या घडीला जर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचा निर्णय म घेतला तर आगामी निवडणुक काळात मला याचा फटका बसू शकतो. त्यामुळे राज ठाकरेंशी भेट घेऊन मी त्यांना सर्व परिस्थिती समजवणार असल्याचं वसंत मोरेंनी सांगितलं.

Related Stories

No stories found.