BMC निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय : ‘राज्यकर्ता’ ठरवणार मनसेची व्यूहरचना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : महापालिकांच्या निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत सध्या प्रश्नचिन्ह आहे. मात्र सर्वच पक्षांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारीला सुरुवात केली आहे. यात राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष देखील मागे नाही. आगामी मुंबई महापालिकेचे मैदान मारण्यासाठी मनसेनेही आता कंबर कसली आहे.

राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेची व्यूहरचना ठरविण्यासाठी ‘राज्यकर्ता’ या पुणेस्थित खासगी एन्जसीला काम सोपविले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यकर्ता ही एजन्सी 100 वॉर्डचे सर्वेक्षण करणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीपर्यंत ही एजन्सी मनसेला एकूण 3 टप्प्यात सॅम्पल सर्वेक्षणाचे अहवाल सादर करणार आहे.

राजकारणातील मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती, निवडणुका एकत्र लढणार

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या अहवालातून संबंधित वॉर्डातील राजकीय स्थिती, मतदारांची भूमिका, वार्डाचा विकास आणि नागरी समस्या सोडवण्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती आणि आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर हा सर्व्हेक्षण अहवाल पक्षाला सादर करण्यात येणार आहे. मनसेची स्थापना 2006 साली झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंतच्या 16 वर्षांच्या राजकीय प्रवासात मनसेने प्रथमच एका खासगी एजन्सीची निवड केली आहे.

CM Eknath Shinde : “ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा हे आनंद दिघेंचं स्वप्न होतं”

ADVERTISEMENT

2017 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 227 वॉर्डांपैकी शिवसेनेला 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9 आणि मनसेने 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या अवघ्या काहीच दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये मनसेच्या 6 नगरसेवकांनी मनसेला रामराम करुन शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेवर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT