'...तर 'त्यांच्या' असंतोषाचा उद्रेक होईल.', राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केलं सावध!

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांच्या मनातील असंतोष व्यक्त केला आहे.
'...तर 'त्यांच्या' असंतोषाचा उद्रेक होईल.', राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केलं  सावध!
mns raj thackeray letter to cm uddhav thackeray maharashtra st bus employee problem(फाइल फोटो, सौजन्य: India Today)

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीच्या मुहूर्तावरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खरमरीत पत्रच पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी एसटी कामगाराच्या व्यथा मांडल्या आहेत. तसचं याच पत्रातून राज ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे.

'एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल.' अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्य सरकारला एक प्रकारचा धोक्याचा इशाराच दिला आहे.

पाहा राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय...

'कोरोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच, 'एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा' ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.'

'अनेक आगारांमधील काम ठप्प आहे. ज्या आगारांमध्ये काम सुरु आहे, तिथेही असंतोष खदखदत आहेच. अशा स्थितीत ऐन दिवाळीच्य दिवसांत कर्मचाऱ्यांना 'सेवा समाप्ती कारवाई करण्यात येईल' अशा नोटीसा एसटी महामंडळाने बजावल्या आहेत. दबावतंत्राचा अवलंब करुन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करुन घेण्यात येत आहे.'

'एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडलाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टींमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे.'

'आज गरज आहे ती एसटी कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची. 'एसटी कर्मचारी- कामगार जगला, तरच एसटी जगेल' हे भान बाळगण्याची.'

'माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी-कामगारांमथधील असंतोषाचा उद्रेक होईल.'

'माझ्या या मागणीचा आपण गांभीर्यपूर्वक विचार कराल आणि योग्य ते आदेश परिवहन मंत्री तसंच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना द्याल हीच अपेक्षा.' अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

mns raj thackeray letter to cm uddhav thackeray maharashtra st bus employee problem
बाळासाहेब ठाकरेंचा आक्रमक हिंदुत्वाचा वारसा राज ठाकरे पुढे नेऊ शकतात का?

दरम्यान, राज ठाकरे यांच्या या पत्रातील मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in