'मोदी सरकार ब्रिटिशांच्या राजवटीसारखेच! मात्र याद राखा...' जया बच्चन यांचा इशारा

जया बच्चन यांची मोदी सरकारवर घणाघाती टीका
'मोदी सरकार  ब्रिटिशांच्या राजवटीसारखेच! मात्र याद राखा...' जया बच्चन यांचा इशारा

मोदी सरकार आणि ब्रिटिशांची राजवट यात काय फरक आहे? इंग्रजही आपल्या घाबरवायचे आणि सत्ता गाजवायचे आत्ताही तेच चाललं आहे. मात्र या सरकारने लक्षात ठेवावं की आपल्या देशातल्या जनतेने इंग्रजांना हाकलून लावलं होतं असं म्हणत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी मोदी सरकारवर टीकेचे ताशेरे झाडले आहेत.

i give curse that bad days to come jaya bachchan raged on bjp government in parliament
i give curse that bad days to come jaya bachchan raged on bjp government in parliament(फोटो सौजन्य: राज्यसभा टीव्ही)

आज जया बच्चन या ज्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे त्यांना भेटण्यासाठी संसदेतल्या गांधी पुतळ्याजवळ गेल्या होत्या. तिथे त्यांनी आजतकशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत. या सरकारला या खासदारांचा प्रश्न सोडवायचा नाही तर भिजत ठेवायचा आहे. माझे हे सहकारी एक महिन्यापासून आंदोलन करत आहेत. मात्र या सरकारला माणुसकी नाही. यांच्यावर खोटे आरोप लावून यांना निलंबित करण्यात आलं आहे. माणुसकी विसरलेलं हे सरकार आहे मात्र या सरकारने हे विसरू नये की सगळा देश त्यांच्या या अन्यायाकडे पाहतो आहे.

'मोदी सरकार  ब्रिटिशांच्या राजवटीसारखेच! मात्र याद राखा...' जया बच्चन यांचा इशारा
Jaya Bachchan: 'मी शाप देते.. तुमचे 'बुरे दिन' येतील', जया बच्चन भर सभागृहात एवढ्या का संतापल्या?

तपास यंत्रणांचा चुकीचा उपयोग केला जातो आहे का? ऐश्वर्या रायलाही पाच तास चौकशीला सामोरं जावं लागलं असं विचारलं असता जया बच्चन म्हणाल्या की, 'मी माझ्या कुटुंबीयांबाबत काही भाष्य करणार नाही किंवा मी पर्सनलही काही बोलणार नाही. मात्र तुम्ही पेडलर्सना का पकडता? या घटनांच्या मुळापर्यंत का जात नाही? 26 अशा केसेस आहेत ज्यातल्या 15 केसेसचे सरकारकडे काहीही पुरावे नाहीत. तरीही केसेसमध्ये काही लोकांना अडकवलं जातं आहे. जे लोक चुकीचं वागत आहेत, या प्रवृत्तींना खतपाणी घालत आहेत त्यांच्यावर कारवाई का नाही?'

ऐश्वर्यालाही पाच तास चौकशीसाठी बसवून ठेवण्यात आलं याबद्दल काय सांगाल असं विचारलं असता जया बच्चन म्हणाल्या की, 'मी त्याबाबत बोलणार नाही. मात्र मी या खासदारांबाबत नक्की बोलेन की जे निष्पाप आहेत. त्यांची चूक एवढीशी आहे. त्या चुकीला हे सरकार माफी देत नाही. घाबरवतं आहे. इंग्रजांची राजवटही अशीच होती. ज्या लोकांनी लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांची हत्या केली तो खासदार संसदेत आहे. त्यांना कुणीही बाहेर काढत नाही. आता या लोकांना मात्र कारण नसताना महिनाभर बाहेर बसवलं आहे, त्यांच्यावर खोटे आरोप लावून कारवाई केली आहे. जनता हे सगळं पाहते आहे याचं उत्तर जनता या सरकारला नक्की देईल.' असं जया बच्चन यांनी सुनावलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in