EPFO Interest Rate Final: मोदी सरकारचा नोकरदारांना मोठा धक्का, PF व्याजदरात कपात

EPFO Interest Rate Final: मोदी सरकारचा नोकरदारांना मोठा धक्का, PF व्याजदरात कपात
modi govt implemented new interest on epf employee will now get only 8.1 percent interest(फाइल फोटो)

नवी दिल्ली: मोदी सरकारने देशभरातील नोकरदार वर्गाला मोठा धक्का दिला आहे. कारण सरकारने 2021-22 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ठेवींवर 8.1 टक्के व्याजदर मंजूर केला आहे. ईपीएफओ कार्यालयाने ही माहिती दिली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) मंजुरीनंतरच ग्राहकांच्या खात्यात व्याज जमा केले जाते. मार्च महिन्यात ईएफपीओने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ते 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणले होते.

लवकरच जमा होणार व्याज

असे सांगितले जात आहे की, पीएफवरील व्याजदर (Interest Rate on PF) अद्याप कमी आहे. त्यामुळे डिसेंबरपूर्वीच ते जमा केले जाऊ शकते. सध्या पीएफवर 43 वर्षांत सर्वात कमी व्याज मिळत आहे. आता अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर, EPFO ​​सदस्यांच्या पीएफ खात्यात (PF Account) कधीही व्याज जमा केले जाऊ शकते.

सर्वात कमी व्याज दर

सध्या पीएफवरील व्याज दर अनेक दशकांतील सर्वात कमी पातळीवर आहे. EPFO ने 2021-22 साठी PF चा व्याज दर 8.1 टक्के निश्चित केला आहे. 1977-78 पासून पीएफवरील हा सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी 2020-21 मध्ये पीएफवर 8.5 टक्के दराने व्याज मिळत होते. 2020-21 (FY21) या आर्थिक वर्षात PF च्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. याच्या एक वर्ष आधी म्हणजे 2019-20 मध्ये हा व्याजदर 8.65 टक्क्यांवरून 8.5 टक्के करण्यात आला होता.

तुमचे पीएफचे पैसे कुठे गुंतवले जातात?

EPFO पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा झालेले पैसे अनेक अनेक ठिकाणी गुंतवते. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग व्याजाच्या स्वरूपात खातेदारांना दिला जातो. सध्या, EPFO ​​डेट (Debt) ऑप्शंसमध्ये 85 टक्के गुंतवणूक करते. यामध्ये सिक्युरिटी (Govt Securities) आणि बाँड (Bond) यांचाही समावेश आहे. तर उर्वरित 15 टक्के रक्कम ईटीएफमध्ये (ETF) गुंतवली जाते. पीएफचे व्याज कर्ज आणि इक्विटीच्या कमाईच्या आधारावर ठरवले जाते.

असा चेक करा आपला पीएफ

  • EPFO वेबसाइटवर जा.

  • अवर सर्विसेज (Our Services) च्या ड्रॉपडाउनमधून 'फॉर एम्पलॉइज (For Employees)हा पर्याय निवडा.

  • यानंतर सदस्य पासबुकवर (Member Passbook) क्लिक करा.

  • आता UAN नंबर आणि पासवर्डच्या (Password) मदतीने लॉगिन करा.

  • पीएफ खाते निवडा आणि ते उघडताच तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स दिसेल.

  • एसएमएसद्वारे (SMS) शिल्लक तपासण्यासाठी, 'EPFOHO UAN ENG' टाइप करून 7738299899 वर SMS पाठवा. तुम्हाला प्रत्युत्तरात तुमचा नेमका किती बॅलन्स आहे याची माहिती मिळेल. याशिवाय उमंग अॅपवरूनही (Umang App) पीएफ शिल्लक तपासता येईल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in