मोहन डेलकरांच्या पत्नी आणि मुलाने हातावर बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश - Mumbai Tak - mohan delkar wife and son joins shivsena in the presence of uddhav thackeray and sanjay raut - MumbaiTAK
बातम्या

मोहन डेलकरांच्या पत्नी आणि मुलाने हातावर बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

दादरा नगर हवेलीचे भाजपचे खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि मुलगा अभिनव डेलकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे खासदार होते. त्यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. त्यांची सुसाईड नोट सापडली होती, यावरून अर्थसंकल्पीय […]

दादरा नगर हवेलीचे भाजपचे खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि मुलगा अभिनव डेलकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे खासदार होते. त्यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. त्यांची सुसाईड नोट सापडली होती, यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात बराच गदारोळ झाला होता.

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी सिल्वासाच्या जिल्हाधिकाऱ्यांची हायकोर्टात याचिका

मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार होते. डेलकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. या पार्श्वभूमीवर मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि अभिनव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मोहन डेलकर यांची सुसाईड नोट

मरीन लाईन्स चौपाटी येथील सी ग्रीन हॉटेलमधील रूममध्ये मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. खासदार मोहन डेलकर यांनी 15 पानांची सुसाईड नोट लिहिली असून, ही नोट खासदारांसाठी असलेल्या लेटरहेडवर लिहिली असल्याचं मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

कोण होते मोहन डेलकर?

58 वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − 7 =

Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल