ED Summons : अनिल परब यांना ईडीकडून दुसरं समन्स; सोमवारी होणार चौकशी

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून तपास सुरू असून, अनिल परब यांचं यात नाव आल्यानं चौकशी केली जाणार आहे...
ED Summons : अनिल परब यांना ईडीकडून दुसरं समन्स; सोमवारी होणार चौकशी
अनिल परब यांना २८ सप्टेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. त्यांना सोमवारी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे. यापूर्वी अनिल परब यांना समन्स बजावल्यानं राजकारण तापलं होतं. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करण्यात आलेला आहे. याच प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरू आहे.

या प्रकरणात पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझेंने अनिल परब यांच्यावरही आरोप केलेले आहेत. त्यामुळे ईडीकडून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. मागच्या समन्सला हजर राहू न शकल्याने परब यांना आता दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे.

पहिल्या समन्सवेळी काय झालं होतं?

अनिल परब यांना ईडीने ३१ ऑगस्ट रोजी समन्स बजावलं होतं. मात्र, त्यावेळी अनिल परब हे चौकशीसाठी हजर होऊ शकले नव्हते. मंत्री असल्याने आणि आधीच नियोजित कार्यक्रम असल्याने वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी परब यांनी ईडीकडे केली होती. त्यानंतर ईडीने दुसरं समन्स बजावलं आहे.

अनिल परब यांना २८ सप्टेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वसुलीचे पैसे स्विकारणारा No.1 कोण? ED चौकशीत Sachin Vaze ने महत्वाची दिली महत्वाची माहिती

सचिन वाझेने अनिल परबांवर काय केलाय आरोप?

अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. अनिल परब व अनिल देशमुक यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यासाठी २०-२० कोटी रुपये घेतले होते', असं सचिन वाझेने ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलेलं आहे.

अनिल परब यांना २८ सप्टेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
'Anil Parab-Anil Deshmukh यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी घेतले 40 कोटी'

अधिकाऱ्यांकडून ४० कोटी रुपये घेण्यात आले होते. त्यातील २० कोटी अनिल देशमुख, तर २० कोटी अनिल परब यांनी घेतले. अनिल देशमुखांचा खासगी सचिव संजीव पलांडेने हे पैसे स्वीकारले होते. तर आरटीओ उपायुक्त बजरंग खरमाटेंने अनिल परबांचे पैसे स्वीकारले होते, असंही वाझेने या जबाबात म्हटलेलं आहे.

Related Stories

No stories found.