MOOD OF THE NATION : मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी भाजपतील ‘या’ नेत्याला सर्वाधिक पसंती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षांनंतर केंद्र सरकार, सरकारचे निर्णय आणि देशाच्या भविष्यातील नेतृत्वाबद्दल जनतेच्या मनातील कल जाणून घेण्यासाठी इंडिया टुडेनं एक सर्वेक्षण केलं. वेगवेगळं जनमत दिसून आलं. यात भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांना लोकांनी पसंती दर्शवली.

जुलै २०२१ मध्ये ‘मूड ऑफ द नेशन’ हे सर्वेक्षण करण्यात आलं. या पाहणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी होण्याची क्षमता भाजपतील कोणत्या नेत्यामध्ये आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आदी नावांचा पर्याय होता.

मोदींचा उत्तराधिकारी म्हणून अमित शाहांना सर्वाधिक पसंती

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी म्हणून भाजप नेत्यांपैकी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सक्षम असल्याचं बहुतांश लोकांचं मत आहे. अमित शाह यांच्या लोकप्रियतेत घसरण झालेली असली, तरी पहिलं स्थान कायम आहे. जानेवारी २०२१ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधानपदासाठी मोदींचा उत्तराधिकारी म्हणून तब्बल ३० टक्के मतं मिळाली होती.

जुलै २०२१ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात यात घट झाल्याचं दिसून आलं. तरीही शाह यांनाच पसंती असून, २४ टक्के लोकांनी मोदींचे उत्तराधिकारी म्हणून भाजपत शाह सक्षम पर्याय असल्याचं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अमित शाहनंतर कोण?

अमित शाह यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाला लोकांनी सक्षम उत्तराधिकारी पसंती दर्शवली आहे. पंतप्रधानपदासाठी मोदींनंतर योगी आदित्यनाथ हे भाजपतून सक्षम पर्याय असल्याचं १९ टक्के लोकांचं मत आहे. मात्र, योगींबद्दलच्या या मतांमध्ये घट झाली आहे. जानेवारी २०२१ मध्ये २१ टक्के लोकांना योगी हे सक्षम पर्याय असल्याचं वाटतं होतं.

यादीत गडकरी कितव्या क्रमांकावर?

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या कामामुळे कायमच चर्चेत असतात. पंतप्रधान पदासाठी गडकरी भाजपात सक्षम पर्याय असल्याचं बोललं जातं. पण मूड ऑफ द नेशनच्या पाहणीत नितीन गडकरी चौथ्या क्रमांकावर आहेत. ७ टक्के लोकांना गडकरी सक्षम पर्याय असल्याचं वाटतं. यात महत्त्वाचं म्हणजे शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्या मतांमध्ये घसरण झालेली असली, तरी गडकरी सक्षम पर्याय असल्याचं मत असणाऱ्या लोकांमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी २०२१ मध्ये ५ टक्के लोकांनीच गडकरी यांच्या नावाला पसंती दिली होती. त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT