Covid 19 : देशात कोरोनाचा विस्फोट, 24 तासात 1 लाख 17 हजार 100 नवे रूग्ण

Covid 19 : देशात कोरोनाचा विस्फोट, 24 तासात 1 लाख 17 हजार 100 नवे रूग्ण
कोरोना रुग्ण तपासणी फोटो-इंडिया टुडे

जगभरात कोरोनाची तिसरी लाट आल्याचा अंदाज आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. भारतातही कोरोना आणि ओमिक्रॉनची दहशत पसरली आहे. अशात मागील चोवीस तासात 1 लाख 17 हजार 100 रूग्ण आढळले आहेत. बुधवारच्या तुलनेत देशात 28 टक्के रूग्ण जास्त वाढले आहेत. बुधवारी 90 हजाराहून अधिक कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आता कोरोना रूग्ण 1 लाख 17 हजार 100 नवे रूग्ण आहेत.

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

भारतात मागील 24 तासांत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून 3 लाख 71 हजार 63 झाली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आढळले आहेत. केवळ या तीन राज्यांमध्ये 60 टक्के नवे कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोना रुग्ण तपासणी
Corona : इटलीहून भारतात आलेल्या विमानात कोरोना विस्फोट!.... 170 पैकी 125 प्रवासी पॉझिटिव्ह

कोरोनाच्या साथीमुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या 4 लाख 83 हजार 178 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल 30 हजार 836 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 71 हजार 845 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाचे तीन कोटी 52 लाख 26 हजार 386 रुग्ण आढळले आहेत.

भारतात ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या 3007 रुग्णांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव देशात वेगानं वाढताना दिसत आहे. आता देशात या व्हेरियंटनं दुसरा मृत्यू झाला आहे. ओदिशातील बोलांगीरमध्ये 55 वर्षांच्या एका महिलेचा ओमायक्रॉनमुळं मृत्यू झाला आहे. यापूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका 73 वर्षांच्या वृद्धाचा ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झाला होता. या दोन्ही व्यक्तींनी बाधित होण्यापूर्वी विदेशवारी केलेली नव्हती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in