Corona : मुंबई लॉकडाऊनच्या दिशेनेच, दिवसभरात 10 हजार 860 रूग्णांची नोंद

Corona : मुंबई लॉकडाऊनच्या दिशेनेच, दिवसभरात 10 हजार 860 रूग्णांची नोंद

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाही त्यामुळे मुंबईत्या वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनेच चालली आहे हे समोर येतं आहे. मुंबईत दिवसभरात 10 हजार 680 नवे रूग्ण दिवसभरात आढळले आहेत. तर दिवसभरात 654 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 वरून 92 टक्क्यांवर आला आहे. मुंबईत सध्याच्या घडीला 47 हजार 476 सक्रिय रूग्ण आहेत. 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीतला रूग्ण वाढीचा दर अर्थात ग्रोथ रेट हा 0.63 टक्के इता आहे.

कोरोना चाचणी
कोरोना चाचणी (प्रातिनिधिक फोटो)

मुंबईत कसे वाढत गेले रूग्ण पाहू

3 जानेवारी- 8082

2 जानेवारी - 8063 रूग्णांची नोंद

1 जानेवारी - 6347 रूग्णांची नोंद

31 डिसेंबर- 5631 रूग्णांची नोंद

30 डिसेंबर- 3671

29 डिसेंबर - 2510 रूग्णांची नोंद

28 डिसेंबर - 1377 रूग्णांची नोंद

27 डिसेंबर - 809 रूग्णांची नोंद

26 डिसेंबर - 922 रूग्णांची नोंद

25 डिसेंबर-757 रूग्णांची नोंद

24 डिसेंबर-683 रूग्णांची नोंद

23 डिसेंबर- 602 रूग्णांची नोंद

22 डिसेंबर 490 रूग्णांची नोंद

21 डिसेंबर 327 रूग्णांची नोंद

21 डिसेंबरला 327 रूग्ण मुंबईत होते मात्र आता ती संख्या 10 हजारांच्या वर गेली आहे. मुंबईसाठी ही नक्कीच चिंतेची आणि काळजीची बाब आहे. मुंबईत वाढत्या कोरोना रूग्णांमुळे शाळाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Corona : मुंबई लॉकडाऊनच्या दिशेनेच, दिवसभरात 10 हजार 860 रूग्णांची नोंद
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांचं साताऱ्यात सूचक वक्तव्य

काय म्हणाल्या मुंबईच्या महापौर?

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. आता पहिली ते नववीचे वर्ग ऑनलाईन सुरू राहतील. महापालिका आयुक्त इक्बाल चहल हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेनंही दोन कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही मोठी गर्दी आणि कार्यक्रम टाळावेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेनं सोसायट्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याबद्दलही माहापौरांनी यावेळी माहिती दिली. "ज्या विंगमध्ये 20 किंवा त्यापेक्षा कोविड बाधित रुग्ण आढळतील ती इमारत सील करण्यात येणार आहे. आतापर्यंत 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येत होती", असं त्या म्हणाल्या.

यावेळी महापौरांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचंही आवाहन केलं. "ओमिक्रॉनला घाबरू नका. परिस्थिती चिंताजनक आहे. लॉकडाऊन असताच कामा नये. आता सगळे सावरतायेत. लॉकडाऊनमुळे सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आपण प्रत्येकाने ठरवले, तर लॉकडाऊन टाळता येईल. गर्दी करणार नाहीय गर्दीत जाणार नाही, असा निर्धार करा. घरातील सर्वांचे लसीकरण करून घ्या. मास्क काढणार नाही. बसमध्ये काय सगळीकडेच नियम पाळेन. विना मास्क फिरणार नाही. आपल्यामुळे इतरांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घ्या, असेही महापौर पेडणेकर म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in