महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारांहून जास्त नवे Corona रूग्ण, 104 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 196 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 104 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 688 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 62 लाख 72 हजार 800 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.3 टक्के इतका झाला आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 39 लाख 76 हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 64 हजार 876 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 91 हजार 701 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 2121 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात 51 हजार 238 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 4 हजार 196 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 64 लाख 64 हजार 876 इतकी झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईत 323 नवे रूग्ण

मुंबईत दिवसभरात 323 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 272 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मुंबईत आज कोरोनामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या रूग्णाचं वय 40 ते 60 च्या घरात आहे. मुंबईत आज घडीला 3106 सक्रिय रूग्ण आहेत. आत्तापर्यंत मुंबईत 15 हजार 977 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 लाख 44 हजार 155 रूग्णांना कोरोना झाला आहे. तर आत्तापर्यंत 7 लाख 22 हजार 621 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

ADVERTISEMENT

पुण्यात 243 नवे रूग्ण

ADVERTISEMENT

पुण्यात 243 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर 208 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनामुळे दिवसभरात 4 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आज घडीला 2265 सक्रिय रूग्ण आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT