पुण्यातील वारजे भागात तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

दोन्ही आरोपी पोलिस ठाण्यातून पसार, वारजे पोलिसांकडून शोध सुरु
पुण्यातील वारजे भागात तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

पुण्याच्या कर्वेनगर भागातील शाहू कॉलनी येथे एका तरुणी आणि तिच्या आईने शेजाऱ्यासोबत झालेल्या वादातून गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मायलेकींना पोलीस ठाण्यात नेलं असता मुलीने ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी मृणाल किरण पाटील (वय २१) आणि संजना किरण पाटील (वय ४०) यांच्याविरुद्ध फिर्यादी सुनीता दळवी यांनी तक्रार दिली आहे. सुनीता दळवी आणि आरोपी संजना पाटील व मृणाल पाटील या शेजारी राहतात. दळवी यांच्या कुत्र्याने पाटील यांच्या घरासमोर घाण केली होती, त्यावरुन दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता.

या वादानंतर संजना आणि मृणाल यांनी दळवी यांच्या वाहनांची तोडफोड करायला सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. या मायलेकींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मृणालने ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला माझा गुन्हा काय असा प्रश्न विचारत उर्मट भाषेत बोलायला सुरुवात केली. यावेळी आरोपी मृणालने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर हात टाकत तिच्या शर्टाचं बटण तोडलं.

यानंतर दोन्ही आरोपी पोलीस ठाण्यातून निघून गेल्या. वारजे पोलीस सध्या या आरोपींचा शोध घेत आहेत.

पुण्यातील वारजे भागात तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Pune Crime : क्षुल्लक कारणावरुन अल्पवयीन मुलांनी केली हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in