इंग्लंडहून नागपूरला आलेल्या आई आणि मुलीला कोरोना , जिनोम सिक्वेन्सिंगला पाठवण्यात आले नमुने

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंग्लंडहून नागपूरला आलेली आई आणि मुलीला कोरोना झाला आहे. त्यामुळे या दोघींना नागपूरच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोघींची प्रकृती सध्या स्थिर आहे. या दोघींचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यानंतर या दोघींना कोरोनाच्या ओमिक्रॉनची बाधा झाली आहे का? हे समजू शकणार आहे.

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 29 नोव्हेंबरला युकेहून प्रवास करत पती, पत्नी आणि त्यांची मुलगी हे मुंबईला आले. त्यानंतर आई-मुलगी या दोघी नागपूरला आल्या. या महिलेचं माहेर नागपूरला असल्याने ती आपल्या मुलीला घेऊन नागपूरला आली. तिचा पती मुंबईतच होता. त्याला कोरोना झाल्याची माहिती मिळाली. ज्यानंतर त्याने तातडीने आपल्या पत्नीला कळवलं. ज्यानंतर या दोघींनीही कोरोनाची चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली. ज्याची माहिती तातडीने नागपूर महापालिकेला देण्यात आला. त्यानंतर या दोघींना एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोघींना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे का? हे जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल आल्यानंतरच समजू शकणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

निगेटीव्ह रिपोर्ट आल्याशिवाय एअरपोर्टबाहेर प्रवेश नाही –

RTPCR चाचणीसाठी ऑनलाईन नोंद केलेल्या लोकांसाठी इमिग्रेशन काऊंटरबाहेर एक वेगळा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. प्रवाशांचं तापमान तपासण्यासाठी या जागेवर थर्मल स्कॅनिंग मशिन्स बसवण्यात आली आहेत. या थर्मल स्कॅनिंग मशिन्समुळे गर्दी होण्याचे प्रकार टाळले जात आहेत. याव्यतिरीक्त ज्या व्यक्तींनी RTPCR टेस्टसाठी ऑनलाईन नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एअरपोर्ट प्रशासनातर्फे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या मदतीसाठी प्रत्येक महत्वाच्या काऊंटवर ५ ते ६ व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

प्रवाशांची थर्मल टेस्टिंग झाल्यानंतर पुढे कोविड चाचणीचा टप्पा येतो. सध्याच्या घडीला कोविड चाचणी करण्याचं कंत्राट काही कंपन्यांना देण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला विमानतळावर चार कंपन्यांमार्फत कोवीड चाचणी केली जात असून सर्वांसाठीचं शुल्क एकसारखंच आहे. प्रवाशांना चाचणीसाठी फार काळ ताटकळत वाट पहावी लागणार नाही याची काळजी इथे घेण्यात आलेली आहे. प्रवाशांनी आपली माहिती दिल्यानंतर त्यांची तात्काळ कोविड टेस्ट केली जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT