Crime: देहविक्रीसाठी आईने 5 वर्षाच्या मुलीला विकलं, नराधमाकडून बलात्कारनंतर चिमुकलीची हत्या

Crime: देहविक्रीसाठी आईने 5 वर्षाच्या मुलीला विकलं, नराधमाकडून बलात्कारनंतर चिमुकलीची हत्या
mother sells 5 year old girl for prostitution girl murdered after being raped by man(Photo- Russel County Sheriff's Department)

जॉर्जिया: एका आईने आपल्या पाच वर्षांच्या मुलीला चक्क देहविक्रीसाठी विकल्याची अत्यंत धक्कादायक घटना अमेरिकेतील जॉर्जियामध्ये घडली आहे. सगळ्यात खळबळजनक बाब म्हणजे महिलेकडून मुलगी विकत घेणाऱ्या व्यक्तीने मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली आहे. 'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पोलिसांनी मंगळवारी मृत मुलीची आई क्रिस्टी सिपलला अटक केली आहे. तिच्यावर मानवी तस्करी आणि हत्येचा आरोप निश्चित करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'क्रिस्टी सिपल हिने आपल्या मुलीला एका व्यक्तीला अवघ्या काही रुपयांसाठी विकलं. पीडित मुलीचा मृतदेह अलाबामाच्या फिनिक्स शहरात असलेल्या एका निर्जन घरात आढळून आला. हीच मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार काही वेळापूर्वी दाखल करण्यात आली होती.;

अटक होण्याआधी, क्रिस्टीने WTVM-TV ला सांगितले की तिच्या मुलगी बेपत्ता आणि हत्येत तिचा कोणताही सहभाग नाही. ती म्हणाली, 'मी आई आहे. मी असे काहीही केलेले नाही. ती माझं आयुष्य होतं आणि मी तिच्यासाठीच जगत होते. मला तीन मुलं आहेत. पण तरीही माझं माझ्या मुलीवर खूप प्रेम होतं.'

क्रिस्टीने सांगितले की, 'तिचे पती कोरी हॉलंड यांच्याकडे मुलीचा ताबा होता. जेव्हा मी तिच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचली तेव्हा माझ्या पतीने मला तिथून हाकलून दिले.'

यावेळी क्रिस्टीने मीडियावर तिची प्रतिमा खराब केल्याचा आरोपही केला आहे. क्रिस्टी म्हणाली, 'मी निर्दोष आहे. मी काहीही चुकीचे केलेले नाही. मीडियानेही माझी इतकी बदनामी केली आहे की, लोक मला दुष्ट स्त्री समजू लागले आहेत.'

तर, पोलिसांचे म्हणणे आहे की, क्रिस्टीने आपली मुलगी जाणूनबुजून एका पुरुषाला विकली. आरोपी क्रिस्टीशिवाय पोलिसांनी 37 वर्षीय जेरेमी ट्रेमेन विल्यम्सलाही अटक केली आहे. त्यानेच मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. शवविच्छेदन अहवालात हे देखील उघड झाले आहे की, हत्येपूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार सुद्धा करण्यात आले होते.

आरोपी जेरेमी विलियम्स (Photo- Russel County Sheriff's Department)
आरोपी जेरेमी विलियम्स (Photo- Russel County Sheriff's Department)
mother sells 5 year old girl for prostitution girl murdered after being raped by man
Crime: चर्चचा पाद्री निघाला विकृत नराधम, अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पत्नी करायची व्हीडिओ शूट

त्याचवेळी मुलीच्या वडिलांनीही या सगळ्यासाठी क्रिस्टीला जबाबदार धरले. तो म्हणाला, 'क्रिस्टीने हे कृत्य करून आम्हाला सर्वात जास्त दुखावले आहे आणि आयुष्यभरासाठी वेदना दिल्या आहेत. मात्र, पोलिसांनी तिला अटक केल्याचा मला आनंद आहे. आता आम्ही न्यायापासून फक्त एक पाऊल दूर आहोत.'

दरम्यान, या सगळ्या प्रकरणामुळे संपूर्ण जॉर्जियात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी आई आणि नराधम व्यक्तीला शिक्षेची मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in