Antiliaची सुरक्षा वाढवली, टॅक्सी चालकाकडे अँटिलियाचा पत्ता विचारणाऱ्या दोन संशयितांचा शोध सुरु

Mukesh Ambani Antilia: मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी अचानक सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
Antiliaची सुरक्षा वाढवली, टॅक्सी चालकाकडे अँटिलियाचा पत्ता विचारणाऱ्या दोन संशयितांचा शोध सुरु
mukesh ambani house antilia 2 unknown person address inquiry taximan police security enhancement mumbai police alert

मुंबई: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा सोमवारी अचानक वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका टॅक्सी चालकाचा फोन आला होता. माहिती देताना त्याने सांगितले की, त्याच्या टॅक्सीत बसलेले दोन लोक अँटिलियाचा पत्ता विचारत आहेत. दोन्ही व्यक्तींकडे बॅग असल्याचेही टॅक्सी चालकाने सांगितले.

मुंबई पोलिसांनी ही माहिती देणाऱ्या टॅक्सी चालकाचा जबाब नोंदवला आहे. त्याच्या जबाबाच्या आधारे आता या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी अँटिलियाबाहेर बंदोबस्त वाढवला आहे. तेथे बॅरिकेडिंग लावून तपासणी केली जात आहे. पोलीस आता दोन संशयितांचा शोध घेत आहेत, जे टॅक्सी चालकाकडे अँटिलियाबद्दल चौकशी करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती देणार्‍या टॅक्सी चालकाने ते दोघे जण असल्याचे सांगितले. त्यांच्यामध्ये एक दाढी असलेला माणूस होता. ज्याने टॅक्सी चालकाला किला कोर्टाजवळ अँटिलियाचा पत्ता विचारला. दोघांकडे बॅगही होती. या माहितीनंतर पोलीस त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी नाकाबंदी करून तपास सुरू आहे. खुद्द मुंबई पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकारी या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे मुंबईतील 27 मजली अँटिलियामध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. यावर्षी 25 फेब्रुवारी रोजी अँटिलियाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली कार सापडली होती. त्या वाहनात एक धमकीचं पत्रही सापडलं होतं. ज्यामध्ये अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणातही बरीच खळबळ उडाली होती.

तपासात ती कार मनसुख हिरेन नावाच्या व्यावसायिकाचे असल्याचे निष्पन्न झाले होत. त्याने आठवडाभरापूर्वीच कार चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आठवडाभरानंतर मनसुख हिरेनचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला होता. या संपूर्ण प्रकरणाचा कट रचल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचा एपीआय सचिन वाझे याला अटक करण्यात आली होती. जो सध्या तुरुंगात आहे. तसेच त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

mukesh ambani house antilia 2 unknown person address inquiry taximan police security enhancement mumbai police alert
अँटेलिया, वाझेंना अटक ते 100 कोटींचा लेटरबॉम्ब बदली पाहा आतापर्यंत काय-काय घडलं?

हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं. त्यामुळेच आता जेव्हा पोलिसांना अँटिलियाबाबत संशयास्पद विचारणा होत असल्याचं समजताच आता मुंबईो पोलिसांनी येथील सुरक्षा अधिक वाढवली आहे. दरम्यान, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने पोलिसांनी याबाबत अधिक कोणतीही माहिती जारी केलेली नाही. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in