Covid 19: KEM रुग्णालयातील MBBS च्या 23 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

23 student test positive for COVID19 at KEM Hospital: लस घेतलेली असताना देखील केईएम रुग्णालयातील 23 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
Covid 19: KEM रुग्णालयातील MBBS च्या 23 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
Mumbai: 23 student test positive for COVID19 at KEM Hospital and all are vaccinated

मुंबई: Mumbai Coronavirus: मुंबईतील केईएम (KEM) रुग्णालयात 23 वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एका अधिकाऱ्याने गुरुवारी याबाबतची माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्याला संसर्गाची सौम्य लक्षणे आहेत. तर इतर विद्यार्थ्यांना संक्रमणाची लक्षणे नाहीत आणि त्यांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.

याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, 'केईएम रुग्णालयात 23 एमबीबीएस विद्यार्थी कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना लसीचा किमान एक डोस देण्यात आलेला आहे. त्यापैकी काहींमध्ये सौम्य लक्षणे आहेत. महाविद्यालयात आयोजित केलेल्या काही सांस्कृतिक किंवा क्रीडा कार्यक्रमांमुळे असे झाले असण्याची शक्यता आहे.'

त्या पुढे असंही म्हणाल्या की, 'हे प्रकरण अतिशय गंभीर असून चिंता वाढवणारं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नियमितपणे लोकांना कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्यास सांगतात.'

मुंबईतील शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर फरक पडणार?

दुसरीकडे राज्यातील कोरोनाची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात असल्याने राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे राज्यातील व्यवहार हा सुरुळीतपणे सुरु झाले आहेत.

कालच (30 सप्टेंबर) राज्य सरकारने मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबत देखील निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या टास्क फोर्सने म्हणजेच डॉक्टरांच्या विशेष कृतीदलाने दिलेल्या सूचनांचं पालन करून 4 ऑक्टोबरपासून मुंबईत शाळा सुरु होतील. अशी माहिती इक्बाल सिंग चहल यांनी दिली होती.

टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांनुसार राज्यातल्या ग्रामीण भागात 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वी पर्यंतची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता मुंबईतल्या शाळाही सुरू होणार आहेत अशी माहिती इक्बाल सिंग चहल यांनी दिली होती. शाळा सुरु झाल्या तरीही शाळांमधले खेळ अर्थात Sports सुरू केले जाणार नसल्याचंही चहल यांनी स्पष्ट केलं होतं.

मात्र, आता केईएम रुग्णालयातील तब्बल 23 विद्यार्थ्यांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाल्याने मुंबई महापालिकेचे देखील धाबे दणाणले आहेत. कारण एकीकडे मुंबईतील शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिका घेत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना झालेली कोरोनाची लागण हा चिंतेचा विषय आहे.

त्यामुळे आता शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत मुंबई महापालिका काही पुर्नविचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mumbai: 23 student  test positive for COVID19 at KEM Hospital and all are vaccinated
Corona Vaccine: लस घेतली पण शिस्त नाही पाळली, देशभरात 2.6 लाख लसवंतांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रात काल दिवसभरात सापडले होते 3187 नवे कोरोना रूग्ण

महाराष्ट्रात काल (29 सप्टेंबर) 3187 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर दिवसभरात 49 मृत्यूंची नोंद झाली होती. राज्याचा मृत्यू दर हा 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 3253 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आत्तापर्यंत राज्यात एकूण 63 लाख 68 हजार 530 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.26 टक्के इतका आहे.

Related Stories

No stories found.