Covid Rules : मुंबईतील रहिवासी इमारती सील करण्याच्या नियमांत बदल; BMC ने काढले आदेश

कोविडचा उद्रेक झाल्यानंतर रहिवासी इमारतींसाठी महापालिकेची नवी नियमावली काय?
Covid Rules : मुंबईतील रहिवासी इमारती सील करण्याच्या नियमांत बदल; BMC ने काढले आदेश
मुंबई महापालिकेची नवी नियमावलीप्रातिनिधीक छायाचित्र

मुंबई पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मुंबईत मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत असून, कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. यातच आता कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर रहिवासी इमारती सील करण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने इमारती सील करण्याबाबतच्या नियमावलीत बदल केले आहेत. इमारतीतील 20 टक्क्यांपेक्षा अधिक घरांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यास प्रशासनाकडून संपूर्ण इमारत सील केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेची नवी नियमावली
Corona : काळजीत भर! मुंबईत 8082 नव्या रूग्णांची नोंद, दिवसभरात दोन मृत्यू

नव्या नियमावलीनुसार एखाद्या इमारतीमध्ये वा संकुलात किंवा गृहनिर्माण संस्थेत तितकी घरं आहेत, त्यापैकी 20 टक्के घरांमध्ये कोरोनाचे रुग्ण असतील, तर ती इमारत सील केली जाणार आहे. अशा इमारतीतील रुग्ण व त्यांच्या संपर्कातील रहिवाशांसाठीही नियम घालून देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांनी गृह विलगीकरणाचे नियम कटाक्षाने पाळावेत, असे आदेशच महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

मुंबई महापालिकेची नवी नियमावली
Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 12 हजार 160 नव्या रूग्णांचं निदान, 11 मृत्यूंची नोंद

इमारत सील करण्यासंदर्भातील महापालिकेची नवी नियमावली...

रहिवाशी इमारतीच्या किंवा विंगच्या एकूण क्षमतेपैकी 20 टक्के रहिवारी कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण इमारत किंवा विंग सील केली जाणार आहे.

विलगीकरणात आणि होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणं गरजेचं आहे.

नागरिकांना लक्षणं दिसून आल्यास किमान 10 दिवस विलगीकरणात राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

हायरिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिकांनी 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं तसेच 5 ते 7 दिवसांच्या आत कोरोना चाचणी करावी.

मुंबई महापालिकेची नवी नियमावली
Omicron : ओमिक्रॉनने वाढवलं टेन्शन! नव्या 68 रूग्णांची नोंद, एकूण संख्या 578

इमारतीत कोरोना रुग्ण आढळून आल्यास रुग्ण आणि त्या कुटुंबाला अन्न, औषध तसंच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला जाईल, याची काळजी सोयायटीच्या कमिटीने घ्यावी.

महापालिकेचे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इमारतीच्या कमिटीने सहकार्य करावं.

रहिवासी इमारत सीलमुक्त करायची की नाही, याचा निर्णय वॉर्ड स्तरावर घेतला जाईल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in