मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर ओसरला; २४ तासांत आढळले अडीच हजार रुग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील रुग्णसंख्या वाढत असली, तरी मुंबईतील कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. मागील तीन-चार दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत वेगाने घट होत आहे. महापालिका हद्दीत गेल्या २४ तासांत अडीच हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत, तर १३ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

जानेवारीच्या सुरुवातीला मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं धडक दिली होती. सुरूवातीच्या १५ दिवसांत मुंबईत धडकी भरवणाऱ्या रुग्णसंख्येची नोंद झाली. मात्र मागील आठवडाभरापासून कोविडच्या लाटेचा जोर ओसरला असून, दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना दिसत आहे.

…तर राज्यातील निर्बंध हटवणार; राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईत गेल्या २४ तासांत २,५५० कोरोना रुग्ण आढळून आले, तर २१७ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत मुंबईत ९,९५,७८६ रुग्ण बरे झाले असून, सध्या रिकव्हरी रेट ९६ टक्के इतका आहे. सध्या मुंबईत १९,८०८ सक्रीय रुग्ण असले, तरी मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधीही वाढला असून, तो आता १२५ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट ०.५४ टक्के इतका आहे. सील करण्यात आलेल्या इमारतीच्या संख्येतही घट झाली असून, सध्या मुंबईत २४ इमारतीच सील आहेत.

omicron symptoms : भारतातील ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांमध्ये कोणती लक्षणं आढळली?

ADVERTISEMENT

१० दहा दिवसांत आढळून आलेले रुग्ण (कंसात चाचण्या)

ADVERTISEMENT

१४ जानेवारी – ११,३१७ (५४,९२४)

१५ जानेवारी – १०,६६१ (५४,५५८)

१६ जानेवारी – ७,८९५ (५७,५३४)

१७ जानेवारी – ५,९५६ (४७,५७४)

१८ जानेवारी – ६,१४९ (४७,७००)

१९ जानेवारी – ६,०३२ (६०,२९१)

२० जानेवारी – ५,७०८ (५३,२०३)

२१ जानेवारी – ५,००८ (५०,०३२)

२२ जानेवारी – ३,५६८ (४९,८९५)

२३ जानेवारी – २,५५० (४५,९९३)

Covid19: लस न घेणं जीवावर बेततंय… नव्या स्टडीत आली धक्कादायक माहिती समोर

मृतांच्या संख्येत वाढ…

मुंबईत सध्या १९ हजारांपेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आहेत. यात लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईत दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्णांना लक्षणंच नाहीत. दरम्यान, मुंबईतील रुग्णसंख्या घटत असली, तरी गेल्या आठवड्यापासून मृतांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचं दिसत आहे. १५ जानेवारीपर्यंत मुंबईत दहाच्या आत मृतांची नोंद होत होती. मात्र, १५ जानेवारीपासून १० पेक्षा जास्त मृत्यूंची नोंद होत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT