12 ऑक्टोबरला चौकशीसाठी या, परमबीर सिंग यांना क्राईम ब्रांचने धाडली नोटीस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांना गुन्हे शाखेने धाडली नोटीस
12 ऑक्टोबरला चौकशीसाठी या, परमबीर सिंग यांना क्राईम ब्रांचने धाडली नोटीस

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशीसाठी हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, सचिन वाझे आणि अन्य लोकांच्या विरोधात खंडणीचं प्रकरण दाखर करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला. अशात परमबीर सिंग यांच्या मुंबई येथील घराच्या बाहेर नोटीस चिकटवण्यात आली आहे. एक टीम हरयाणा या ठिकाणीही नोटीस देण्यासाठी गेली आहे. या नोटीसच्या माध्यमातून परमबीर सिंग यांना 12 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

परमबीर सिंग देशाबाहेर गेले आहेत का?

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करत राज्यात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आहेत तरी कुठे अशी चर्चा आता सुरू झाली असतानाच ते देशाबाहेर पळून गेले आहेत असं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या चांदिवाल आयोगाने दोनदा समन्स बजावूनही परमबीर सिंह हजर झालेले नाहीत. त्यामुळे परमबीर सिंह यांनी पलायन केलं असल्याच्या चर्चेनंही जोर धरला आहे. त्यातच आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सिंह परदेशात फरार झाले असल्याचं म्हटलं आहे.

परमबीर सिंग
परमबीर सिंग(फाइल फोटो)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मार्च महिन्यात एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परमबीर सिंग यांनी त्यावेळी राज्याचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी रूपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं असा आदेश दिला होता असं या पत्रात त्यांनी म्हटलं होतं.

12 ऑक्टोबरला चौकशीसाठी या, परमबीर सिंग यांना क्राईम ब्रांचने धाडली नोटीस
'परमबीर सिंग, वाझे जनतेचे सेवकच होते पण करत होते दुसरे धंदे', वानखेडेंवर मलिकांचा निशाणा

तपास यंत्रणांनाही हेच वाटतं आहे की परमबीर सिंग यांनी देश सोडला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त देश सोडून रशियाला गेले असावेत असं तपास यंत्रणांना वाटतं आहे. 7 एप्रिलला परमबीर सिंग हे तपास यंत्रणांसमोर हजर झाले होते. 25 फेब्रुवारीला झालेल्या अँटेलिया बॉम्ब प्रकरणात त्यांना समन्स जारी करण्यात आले होते. 25 फेब्रुवारीला घडलेल्या या प्रकरणानंतर 17 मार्चला परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून होम गार्ड्स खात्यात बदली करण्यात आली. त्यांनी या पदाचा पदभार 22 तारखेला स्वीकारला. त्यानंतर 4 मे पर्यंत ते कार्यालयात हजर राहिले. 5 मेपासून परमबीर सिंग सुट्टीवर गेले.

परमबीर सिंग यांनी आपल्याला प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्याचं कारण देऊन रजा घेतली. मे ते ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र सरकारने त्यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी आधीची रजा वाढवून घेतली. माझी शस्त्रक्रिया झाली असून मला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.

ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही परमबीर सिंग यांनी आपली प्रकृती अद्याप ठीक झाली नसल्याचं सांगितलं आणि रजा वाढवून घेतली. परमबीर सिंग यांना 29 ऑगस्टला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं मात्र तेव्हापासून त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

Related Stories

No stories found.