'क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा खरा सूत्रधार NCP चा सुनिल पाटील, हे खूप मोठं षडयंत्र', मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
mumbai cruise drgus case aryan khan bjp mohit kamboj sensational allegations ncp sunil patil kp gosavi nawab malik(फोटो सौजन्य: Twitter)

'क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा खरा सूत्रधार NCP चा सुनिल पाटील, हे खूप मोठं षडयंत्र', मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा

Bjp Mohit Kamboj sensational allegations Cruise Drugs Case: आर्यन खान ड्रग्स प्रकरणी मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत.

मुंबई: मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही अद्यापही थांबलेल्या नाही. एकीकडे समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतलेला असताना दुसरीकडे आता भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी शनिवारी (6 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन काही खळबळजनक दावे केले आहेत.

धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी सुनील पाटील याच्या मदतीने आर्यन खान प्रकरणातील संपूर्ण षडयंत्र रचण्यात आलं होतं. असा दावा मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. आपल्या पत्रकार परिषदेत कंबोज यांनी अनेक व्हॉट्सअॅप चॅट्स, व्हीडिओ, ऑडिओ क्लिप आणि काही फोटो दाखवत दावे केले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.

मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा

'आर्यन खानच्या संपूर्ण प्रकरणाचा सूत्राधार राष्ट्रवादी काँग्रेसचा सुनील पाटील'

मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खळबळजनक दावे केले आहेत. यावेळी त्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जाणून घ्या मोहित कंबोज यांनी नेमके काय आरोप केले आहेत.

मी आपल्याला संपूर्ण घटनाक्रमाची कहाणी सांगणार आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा खरा सूत्रधार हा सुनील पाटील नावाचा एक व्यक्ती आहे. जो राष्ट्रवादी काँग्रसेच्या फाउंडेशनशी निगडीत आहे. 20 वर्षांपासून तो राष्ट्रवादीशी संबंधित आहे. तो मूळचा धुळ्याचा आहे. याच सुनील पाटीलचे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. अनेक मंत्र्यांशी त्याचे घरोब्याचे संबंध आहेत.

आता अनिल देशमुखांवर जी ईडीची कारवाई सुरु आहे त्यातही सुनील पाटीलचा रोल महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे पैसे हे सुनील पाटीलच घेत होते. 2019 पासून सुनील पाटील आणि त्याची गँग ही अॅक्टिव्ह झाली होती आणि ते ट्रान्सफरचे रॅकेट चालवत होते. यामध्ये अनेक अधिकारी देखील गुंतलेले आहेत.

'क्रूझ ड्रग्स प्रकरणाची माहिती देखील सुनील पाटील यानेच सर्वप्रथम दिली होती'

मात्र, आज मी आपल्याला आर्यन खान केसबाबतच माहिती देणार आहे. आपल्याला माहिती असेल की, आर्यन खान केसमध्ये सॅम डिसूझा या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. खरं म्हणजे आर्यन खानच्या केसची सुरुवात ही 1 ऑक्टोबरपासून होते. त्याच दिवशी सुनील पाटील याने सॅम डिसूझाला पहिले व्हॉट्सअॅप केला आणि नंतर त्याला कॉल केला. यावेळी सुनील पाटीलने सॅमला सांगितलं की, त्याच्याकडे 27 जणांची लीड आहे. मला NCB अधिकाऱ्यांशी बोलणं करुन दे. सॅमने याबाबत व्ही ही सिंग या अधिकाऱ्याशी बोलणं केलं.

यानंतर सुनील पाटीलने किरण गोसावीचा नंबर सॅम डिसूझाला दिला आणि सांगितलं की, याच्याकडे खूप मोठी माहिती आहे. डिसूझाने सुनील पाटीलच्या म्हणण्यानुसार, केपी गोसवीचं व्ही व्ही सिंग यांच्यासोबत देखील बोलणं करुन दिलं.

'भाजपला बदनाम करण्यासाठी रचलं गेलं मोठं षडयंत्र'

या सगळ्यावरुन आपल्याला लक्षात येईल की, हा भाजप आणि केंद्रीय एजन्सीविरोधात खूप मोठा कट आहे.

त्यामुळे जी कारवाई झाली त्याच्याशी ना भाजपचं काही देणंघेणं आहे किंवा भाजपच्या कोण्या कार्यकर्त्याचं. हे स्पष्ट होतं की, केपी गोसावी हा सुनील पाटीलचा माणूस आहे. प्रभाकर सईल हा केपी गोसावीचा ड्रायव्हर आहे. तो देखील सुनील पाटीलचा माणूस आहे. मनिष भानुशाली तो देखील सुनील पाटीलचा माणूस आहे. सॅम डिसूजा हा सुनील पाटीलचा मित्र आहे. तर एक जे अॅफिडेबिट तयार करण्यात आलं ज्यामध्ये सुनील पाटीलचा माणूस म्हणतो की, त्याची माणसं 25 कोटी रुपये हे एका अधिकाऱ्याच्या नावे मागण्यात आले. ज्या अधिकाऱ्याचं या कोणाशीही काहीही संबंध नाही. हे स्पष्ट होतं की, हे संपूर्ण षडयंत्र रचण्यात आलं होतं.

'पैशाची तोडपाणी करण्यासाठी महाराष्ट्रातील मंत्र्यांचाही होता सहभाग?'

महाराष्ट्रात देखील एसआयटी बसविण्यात आली आहे. एसआयटीला याचा खुलासा करावा लागेल की, महाराष्ट्रातील कोणकोणते मंत्री होते की, जे शाहरुख खानसाठी पैशाची तोडपाणी करण्यासाठी सहभागी होते. हे मंत्री ब्लॅकमेलिंगचं रॅकेट चालवित होते? यामागे एक मंत्री एजन्सी आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करत होते आणि वसुलीही करत होते? हे तीन अजेंडा घेऊन चालत होते?

महाराष्ट्रात सेंट्रल एजन्सी आणि भाजपला बदनाम करण्यासाठी मोठं षडयंत्र तर रचलेलं नव्हतं ना? याचं उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्याला द्यावं लागेल. तसेच सुनील पाटील याच्याशी काय संबंध आहेत त्याचंही उत्तर द्यावं लागेल.

ललित हॉटेल जे मुंबईत आहे तिथे गेल्या एक वर्षभरापासून सुनील पाटीलचं एक स्युईट बुक असायचं. शराब, शबाब आणि कबाब यांच्या पार्ट्या तिथे चालायच्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते मंत्री होते जे सुनील पाटीलसह या सगळ्याची मजा घ्यायचे?

mumbai cruise drgus case aryan khan bjp mohit kamboj sensational allegations ncp sunil patil kp gosavi nawab malik
आर्थिक फसवणूक प्रकरणात किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ

'महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे दाऊद इब्राहिमचा गुंड चिंकू पठाणला का भेटले होते?'

'मी एक आणखी मोठा खुलासा करेन की, आम्ही पाहिलं की, 2-3 ग्रॅम ड्रग्स सेवनाला महाराष्ट्राचे मंत्री हे गुन्हा समजत नाहीत. ड्रग्स सेवन करणारा हा 2-3 ग्रॅम ड्रग्सचं घेतो. तो काही 100 ग्रॅम ड्रग्स घेत नाही. मला असं विचारायचं आहे की, ड्रग माफिया यांना शरण देण्याचं काम चाललं आहे का? ड्रग्समधून देशविरोधी कामासाठी वापरले जात आहे त्याला महाराष्ट्रात प्रोत्साहन दिले जात आहे का?'

'दाऊद इब्राहिमच्या टोळीतील गुंड चिंकू पठाण हा MD ड्रग्समधील सर्वात मोठा डिलर आहे. हे अत्यंत घातक ड्रग्स आहे. याला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे हत्यारे, पैसा आणि ड्रग्स देखील सापडलं होतं. मला विचारायचं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस ही ड्रग्स माफियाचे प्रवक्ते म्हणून देशात उतरले आहेत का?'

'महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री हे दाऊदच्या गुंडासोबत सह्याद्री अतिथीगृहात नेमके काय करत होते? हा पाहा त्यावेळचा दोघांचा फोटो. हा फोटो ज्याने काढला त्याचं असं म्हणणं आहे की, एका मंत्र्याचा जावई देखील तिथे होता. समीर पाटीलही तिथे होता. ड्रग्स पेडलरला कसं संरक्षण द्यायचं याचा नेमका भाव तिथे ठरत होता. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी एक गुप्त बैठक झाली होती चिंकू पठाणसोबत ती देखील कोरोनाचं प्रचंड लाट असताना.' असे अनेक गंभीर आरोप मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in