Drug Case: 'आर्यनकडे ड्रग्स सापडले नसले तरी तो कटात सामील', NCBचे कोर्टात उत्तर

Mumbai cruise drug bust case Aryan khan: आर्यन खानकडे जरी ड्रग्स सापडलेले नसले तरीही तो कटात सामील असल्याचं उत्तर NCB ने कोर्टात दिलं आहे.
Drug Case: 'आर्यनकडे ड्रग्स सापडले नसले तरी तो कटात सामील', NCBचे कोर्टात उत्तर
mumbai cruise drug bust case Aryan khan joins conspiracy even drugs not seized ncb responds court(फाइल फोटो)

मुंबई: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनावर आज न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आर्यन खानचे वकील अमित देसाई, सतीश मानशिंदे आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हे देखील कोर्टात पोहचले आहेत. आता एनसीबीनेही आर्यन खान आणि मुनमुन धमेचा यांच्या जामीन अर्जावर आपलं उत्तर कोर्टाला दिलं आहे.

एनसीबीने यावेळी असे म्हटले आहे की, 'या प्रकरणात एका आरोपीची भूमिका दुसऱ्या आरोपीच्या माध्यमातून समजू शकत नाही. आर्यन खान हा जरी ड्रग्ससह सापडलेला नसला तरी तो पेडलरच्या संपर्कात होता. हे एक मोठे षडयंत्र आहे. त्याची तपासणी होणं आवश्यक आहे. आर्यन खानवर अमली पदार्थ खरेदी केल्याचा आरोप होता आणि हेच अंमली पदार्थ अरबाज मर्चंटकडून जप्त करण्यात आले होते.'

सध्या एनसीबी परदेशातील ड्रग्स व्यवहाराबाबत चौकशी करत आहे. आजच्या सुनावणीत आर्यन खान व्यतिरिक्त, नुपूर सारिका, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, श्रेयस नायर, अविन साहू, अचित आणि मोहक जसवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु आहे.

ड्रग्ज प्रकरणात अडकलेला आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याला जामीन मिळावा यासाठी त्याचे वकील गेल्या अनेक दिवसांपासून बरेच प्रयत्न करत आहेत, परंतु प्रत्येक वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) नवनव्या गोष्टी समोर आणून आर्यनला तुरुंगातून बाहेर पडू देत नाहीए. 11 ऑक्टोबरला देखील सत्र न्यायालयात आर्यनचा जामीन फेटाळला होता. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीत नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत आर्यनची केस वकील सतीश मानशिंदे लढत होते, पण आता शाहरुख खानने या खटल्यासाठी वरिष्ठ वकील अमित देसाई यांची नेमणूक केली आहे. सतीश मानशिंदे यांच्यासह 11 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात अमित देसाई देखील दिसले होते.

आर्यनचे वकील सतिश मानेशिंदे
आर्यनचे वकील सतिश मानेशिंदे

एनसीबीने मागितला होता दोन दिवसांचा वेळ

11 ऑक्टोबर रोजी एनसीबीने सत्र न्यायालयात आर्यनच्या जामिनाबाबत बुधवारपर्यंत वेळ मागितला होता. आर्यनचे वकील अमित देसाई आणि सतीश मानशिंदे हे दोघेही सकाळी साडेदहा वाजता न्यायालयात पोहोचले होते.

दुसरीकडे एनसीबीचा खटला लढणारे विशेष सरकारी वकील ए.एम. चिमळकर म्हणाले की, 'तपास सुरू असल्याने ते पुरावे गोळा करण्यासाठी वेळ लागत आहेत.' युक्तिवादानंतर न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी एनसीबीला उत्तर दाखल करण्यासाठी बुधवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत वेळ दिला होता. त्यानंतर आता आज याप्रकरणी सुनावणी सुरु झाली आहे.

शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी
शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी
mumbai cruise drug bust case Aryan khan joins conspiracy even drugs not seized ncb responds court
Drugs Case: शाहरुख खानने आर्यनसाठी नेमला सलमान खानचा वकील, आर्यनला मिळणार जामीन?

शाहरुखच्या ड्रायव्हरचाही नोंदवण्यात आलाय जबाब

आतापर्यंत, NCB ने या प्रकरणात अनेक लोकांची चौकशी केली आहे. मात्र, अद्यापही त्यांचा तपास सुरूच आहे. 9 ऑक्टोबर रोजी एनसीबीने शाहरुख खानच्या ड्रायव्हरची तब्बल 12 तास चौकशी केली होती. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने आर्यन आणि अरबाज मर्चंटला क्रूझ टर्मिनलवर सोडलं असल्याची कबुली दिली होती.

Related Stories

No stories found.