Cruise Drugs Party: आर्यन खानचा ‘तो’ मित्र अरबाज मर्चंट कोण आहे?, ज्याला सुहानाही करते फॉलो

Who is Arbaaz Merchantt Mumbai Cruise Drug Case: शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत अरबाज मर्चंटला देखील अटक झाली आहे. हा अरबाज नेमका कोण आणि तो खान कुटुंबीयांच्या एवढा जवळ कसा याची आता चर्चा सुरु झाली आहे.
Cruise Drugs Party: आर्यन खानचा ‘तो’ मित्र अरबाज मर्चंट कोण आहे?, ज्याला सुहानाही करते फॉलो
Who is Arbaaz Merchantt Mumbai Cruise Drug Case(फाइल फोटो, सौजन्य: Instagram)

मुंबई: बॉलिवूड सूपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. या छापेमारीत एनसीबीनं आर्यन खानसोबतच 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. सर्वांच्या सखोल चौकशीनंतर एनसीबीनं आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना अटक केली. या तिघांनाही कोर्टाने एक दिवसाची NCB कस्टडी सुनावली आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आता हायप्रोफाईल बनलं आहे. पण याचवेळी आर्यनसोबत अटक झालेला अरबाज मर्चंट याच्याविषयी देखील चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहे अरबाज मर्चंट?

ड्रग्ज प्रकरणात अरबाज मर्चंटचं नाव सगळ्यात बडी हस्ती म्हणून समोर येत आहे. अरबाजनेच आर्यन खानला क्रूझवर नेलं होतं, असं सांगितलं जात आहे. तसंच अरबाज नेहमीच ड्रग्ज पार्ट्यांमध्ये जातो, असंही म्हटलं जातं. अरबाज मर्चंटच्या फोन चॅटमध्ये त्याचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. त्यानंतरच एनसीबीनं तपासाची चक्र फिरवली.

अरबाज हा आर्यन खान आणि सुहाना खान यांचा चांगला मित्र आहे. अरबाज हा एक अभिनेता असून इन्स्टाग्रामवर त्याला चांगलं फॅनफॉलोइंग देखील आहे. स्टार किड्ससोबत तो अनेकदा पार्टीमध्ये दिसला आहे.

शाहरुख मुलगी सुहाना खान ही देखील अरबाजला सोशल मीडियावर फॉलो करते. काही दिवसांपूर्वीच अरबाज अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया हिला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

मुंबईहून गोव्याला चाललेली क्रूझ ही Cordelia कंपनीची होती. याच क्रूझवर पार्टी सुरु होती. इथेच छापा मारून NCB ने या पार्टीचा पर्दाफाश केला होता. दरम्यान, NCB च्या चौकशीत आपण निर्दोष असल्याचं आर्यन खानने म्हटलं आहे.

आर्यनच्या मते, तो या पार्टीत फक्त एक 'गेस्ट' म्हणून सहभागी झाला होता. आर्यनशिवाय एनसीबीने या रेडमध्ये 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. ज्यापैकी आर्यनसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीने याबाबत स्पष्ट केलं आहे की, आरोपींनी ड्रग्सचं सेवन केलं होतं. तसंच या छापेमारी दरम्यान, कोकोन, एमडी, एमडीएमए आणि चरस यासारखे ड्रग्सही जप्त करण्यात आले. तर 1 लाख 20 हजाराची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.

Who is Arbaaz Merchantt Mumbai Cruise Drug Case
Cruise Drugs Party: Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan ने ड्रग्सचं सेवन केलं होतं: NCB

आर्यन खानला एक दिवसांची NCB कस्टडी

मुंबईतील क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी किला कोर्टाने आरोपी आर्यन खान याच्यासह दोन आरोपींना एक दिवसासाठी NCB ची कस्टडी सुनावली आहे. त्यामुळे या तीनही आरोपींना आजची रात्र NCB च्या कस्टडीमध्ये घालवावी लागणार आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना आता एक रात्र NCB च्या कस्टडीमध्ये ठेवलं जाणार आहे.

आर्यनच्या वतीने त्याचे वकील सतीश मनेशिंदे हे आता जामीन अर्ज दाखल करणार आहेत. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचे वकीलही त्यांच्यासाठी जामीन अर्ज दाखल करण्याची तयारी करत आहेत. सतीश मनेशिंदे यांनी म्हटले आहे की, ते आता कधीही जामिनासाठी याचिका दाखल करू शकतात.

Related Stories

No stories found.