Drugs case: तुरुंगातून सुटल्यानंतर आज आर्यन खानने का लावली NCB कार्यालयात हजेरी?

Drugs case: तुरुंगातून सुटल्यानंतर आज आर्यन खानने का लावली NCB कार्यालयात हजेरी?
mumbai cruise drugs case shah rukh khan son aryan khan appear before ncb after bail

मुंबई: सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 28 ऑक्टोबरला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाला. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी 28 दिवसांनी तो आपल्या घरी 'मन्नत'वर परतला. दरम्यान, आर्यन खानला 14 अटींवर जामीन मिळाला आहे. यातील एक अट अशी होती की, आर्यन खानला दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागेल.

आर्यन खानने एनसीबी कार्यालयात लावली हजेरी

याच आदेशाचं पालन करत सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा शुक्रवारी (5 नोव्हेंबर) एनसीबी कार्यालयात गेला होता. मन्नत ते एएनसीबी ऑफिसला जातानाचे आर्यनचे काही फोटो समोर आले आहेत. पांढऱ्या रंगाच्या रेंज रोव्हर कारने ते मन्नतहून एनसीबी कार्यालयात गेला. आर्यन खानसोबत त्याचे वकील मानशिंदेही एनसीबी कार्यालयात उपस्थित होते. आर्यन खान तुरुंगातून सुटल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच एनसीबी कार्यालयात गेला आहे.

2 ऑक्टोबर रोजी आर्यन खानला एनसीबीने पकडले तेव्हापासून 7 ऑक्टोबरपर्यंत त्याला एनसीबी कोठडीत ठेवण्यात आले होते. यानंतर न्यायालयाने आर्यन खानला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्यानंतर जामीन मिळेपर्यंत पुढचे सगळे दिवस त्याला आर्थर रोड कारागृहात काढावे लागले होते.

दरम्यान, आर्यन खानला जामीन मिळावा म्हणून त्यांच्या वकिलांनी अनेकदा प्रयत्न केला. अखेर हायकोर्टाकडून त्याला जामीन मंजूर झाला. दंडाधिकारी न्यायालय आणि सत्र न्यायालयात आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. जिथे आर्यन खानला दिलासा मिळाला. तब्बल 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर झाला.

तुरुंगात सुटून आलेल्या आर्यन खानसाठी शाहरुख-गौरीने पाहा काय केलं

आर्यन खानला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी त्याचे वडील शाहरुख खान यांनी प्रचंड जोर लावला होता. यासाठी अनेक दिग्गज वकिलांची फौज त्यांनी उभी केली होती. आर्यन खान तुरुंगात असताना शाहरुख खान आणि गौरी खान यांच्यासाठी प्रत्येक क्षण हा अत्यंत कठीण होता. आपला मुलगा लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर यावा यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु होता. अखेर तब्बल 28 दिवसांनी आर्यन तुरुंगातून सुटून आपल्या घरी परतला.

mumbai cruise drugs case shah rukh khan son aryan khan appear before ncb after bail
'नवाब मलिक दुसऱ्याच्या बेडरूममध्ये कशाला डोकवता?' समीर वानखेडेंवरून नारायण राणेंचा टोला

दरम्यान, आर्यन खानला गुरुवारी 4 नोव्हेंबर रोजी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली. शाहरुख आणि गौरी आपल्या मुलाचे आयुष्य पुन्हा रुळावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आर्यनच्या आरोग्याची, पोषणाची, आहाराची काळजी घेतली जात आहे. आर्यनला समुपदेशन दिले जाईल जेणेकरुन तो ड्रग्स केस प्रकरणाच्या आघातातून बाहेर येऊ शकेल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in