Drugs Case : आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश

Srk's Son: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
Drugs Case : आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश
mumbai cruise drugs party case shah rukh khan son aryan khan bail hearing ncb raid(फाइल फोटो)

मुंबई: क्रूझ ड्रग्स केस प्रकरणात अडकलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज (7 ऑक्टोबर) पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ड्रग्स प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होत आहे. सुनावणीदरम्यान, आरोपींची कोठडी एनसीबीने 11 ऑक्टोबरपर्यंत मागितली होती. आज कोर्टाने आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि तसंच जामिनासाठी अर्ज करण्यासही सांगितलं आहे.

NCB ने सांगितले की क्रूज ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एनसीबीने म्हटले की, आर्यनने नाव घेतल्यानंतर या प्रकरणात अचित कुमार याची अटक झाली आहे. अरबाज मर्जेंटनेही त्याचे नाव घेतले होते. याबाबतची चौकशी करण्यासाठी एजन्सीला आरोपीची कस्टडी वाढवून हवी असल्याचं सांगितलं. .

mumbai cruise drugs party case shah rukh khan son aryan khan bail hearing ncb raid
Shah Rukh Khan Son: EXCLUSIVE: NCB चे अधिकारी अचानक आर्यन खान समोर आले, अन्...

4 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत आर्यनला जामीन मंजूर झाला नाही. त्याऐवजी त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत ठेवण्याचा निर्णय देण्यात आला होता. दरम्यान, आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे हे आज पुन्हा एकदा त्याला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. आजच्या सुनावणीत शाहरुखचा मुलगा आर्यनला जामीन मिळतो की नाही याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

एनसीबीने आर्यनवर केले आहेत गंभीर आरोप

ड्रग्ज प्रकरणी 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. एनसीबीच्या वतीने, न्यायालयात सांगण्यात आलं होतं की, आर्यन खानच्या मोबाइलमध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि चॅट्सच्या लिंक सापडल्या आहेत. ज्यासाठी एनसीबीने पुढील चौकशीसाठी 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली होती. तथापि, न्यायालयाने आर्यन खान आणि इतर दोघांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत राहण्याचे आदेश दिले होते.

एनआयसीबीने आर्यनच्या चॅट्समध्ये अनेक कोड नेम सापडल्याचा दावा

सुनावणीत, एनसीबीच्या वतीने दावा करण्यात आला होता की, आर्यनच्या फोनवरून चॅटिंगच्या स्वरूपात अनेक लिंक्स सापडले आहेत, जे आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीकडे निर्देश करतात. एनसीबीने म्हटले होते - चॅट्समध्ये अनेक कोड नेम देखील सापडले आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी कोठडी आवश्यक आहे.

NCB ने पुढे म्हटले होते की, लिंक आणि संबंध उघड करण्यासाठी कस्टडी आवश्यक आहे. ड्रग्स तस्करांसोबत व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह चॅट करण्यात आलं होतं. या प्रकरणात अजूनही छापे सुरू आहेत. आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये पैशांचे व्यवहार उघड केल्याची बाबही समोर आले आहेत.

आर्यनच्या वकिलाने काय केला होता युक्तिवाद?

आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी न्यायालयात त्यांच्या बाजूने युक्तिवाद केला होता की, आर्यन गेस्ट म्हणून क्रूझवर गेला होता. त्याला विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आलं होतं आणि यासाठी त्याला कोणतेही पैसे देण्यात आले नव्हते. दरम्या, वकिलाने असेही म्हटले होते की, एनसीबीच्या तपासात आर्यनकडून ड्रग्स किंवा पैसे सापडले नाहीत.

एनसीबीने केलेले सर्व आरोप फेटाळताना सतीश मानशिंदे म्हणाले होते - 'आर्यन खानला जहाजात ड्रग्स विकण्याची गरज नाही. आर्यननं मनात आणलं तर त्याला संपूर्ण क्रूझ विकत घेऊ शकतो.'

mumbai cruise drugs party case shah rukh khan son aryan khan bail hearing ncb raid
'NCB नेच तिथे ड्रग्ज ठेवले, CCTV मध्ये दिसेल' आर्यन खानचा मित्र अरबाझ मर्चंटचा आरोप

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कसा अडकला?

खरं तर, शनिवारी 2 ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या टीमने मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ शिपवर छापा टाकला होता. या जहाजात ड्रग्ज पार्टी चालू होती, ज्यात आर्यन खान सुद्धा उपस्थित होता. यानंतर एनसीबीने आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसह अनेक लोकांना आपल्या ताब्यात घेतले होते आणि त्यांची चौकशी करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.