Aryan Khan Drugs Case: 'वानखेडे तुम्ही दिशाभूल करत आहात', नवाब मलिकांचा पुन्हा एकदा वानखेडेंवर हल्लाबोल

Nawab Malik Criticized to Sameer Wankhede: आर्यन खान ड्रग्स प्रकरणातून हटविण्यात आल्यानंतर समीर वानखेडे यांच्या एका प्रतिक्रियेवर नवाब मलिक यांना हल्लाबोल केला आहे.
Aryan Khan Drugs Case: 'वानखेडे तुम्ही दिशाभूल करत आहात', नवाब मलिकांचा पुन्हा एकदा वानखेडेंवर हल्लाबोल
mumbai drug case aryan khan case investigation transfer ncb delhi sit nawab malik slams sameer wankhede

मुंबई: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, समीर वानखेडे यांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण आणि नवाब मलिक यांच्या जावयाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून हटविण्यात आले आहे.

या वृत्तानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

वास्तविक, समीर वानखेडे यांनी असं म्हटलं की, त्यांनी स्वत: या प्रकरणातून आपल्याला हटविण्याची मागणी केल्याचे म्हटले आहे. वानखेडे यांनी असंही म्हटलं की, त्यांनी न्यायालयात एक याचिकाही दाखल केली आहे, त्या याचिकेत हे प्रकरण दिल्ली एनसीबीकडे सोपवावे, असे म्हटले होते. दरम्यान, समीर वानखेडे यावेळी असंही म्हणाले की, 'मी मुंबई झोनचा संचालक आहे आणि राहणार.'

'वानखेडे दिशाभूल करत आहेत'

दरम्यान, समीर वानखेडे यांच्या या वक्तव्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे की, 'एकतर ANI (वृत्तसंस्था) समीर वानखेडे यांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसारित करत आहे किंवा समीर वानखेडे देशाची दिशाभूल करत आहे. त्यांनी कोर्टात रिट याचिका दाखल करुन जबरदस्तीने वसुली आणि भष्ट्राचारबाबत जे आरोप लावण्यात आले आहेत त्याची चौकशी सीबीआय (CBI) किंवा एनआयएकडून (NIA) करण्यात यावी, मुंबई पोलिसांकडून नाही अशी मागणी केली होती. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली. देशाला सत्य समजलं पाहिजे' असं ट्विट नवाब मलिकांनी केलं आहे.

नवाब मलिक यांच्या म्हणण्यानुसार, समीर वानखेडे यांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, त्याच्यावरील आरोपाचा तपास मुंबई पोलिसांनी न करता कोणत्यातरी केंद्रीय एजन्सीमार्फत करावा. समीर वानखेडे यांची याचिका न्यायालयाने फेटाळल्याचे त्यांनी सांगितले.

(फाइल फोटो)

नवाब मलिक यांनी एएनआयच्या ट्विटला रिट्विट करताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्यात समीर वानखेडे यांना आर्यन आणि समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणातून काढून टाकण्याबाबत वक्तव्य केले आहे.

समीर वानखेडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, मला चौकशीतून हटवले गेले नाही. कोर्टात याचिका दाखल करून या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती, असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणांचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करणार आहे.

mumbai drug case aryan khan case investigation transfer ncb delhi sit nawab malik slams sameer wankhede
आर्यन खान प्रकरणी चौकशीचे अधिकार काढल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

नवाब मलिक म्हणाले, 'आर्यन खानचे अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी मी केली होती. आता केंद्र आणि राज्याने दोन एसआयटी स्थापन केल्या आहेत. बघूया त्यांच्या वानखेडे आणि त्यांच्या नापाक वैयक्तिक सैन्याचा पर्दाफाश कोण करतो ते.'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in