Drug Case: 'संपूर्ण ड्रग्स प्रकरणच बनावट', अनेक Video-फोटो दाखवत राष्ट्रवादीचे खळबजनक आरोप

Mumbai Cruise raid forgery Nawab Malik allegations on NCB: मुंबईतील क्रूझवरील छापा हे संपूर्ण प्रकरणच बनावट आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
Drug Case: 'संपूर्ण ड्रग्स प्रकरणच बनावट', अनेक Video-फोटो दाखवत राष्ट्रवादीचे खळबजनक आरोप
mumbai drug case ncb raid forgery ncp nawab malik allegations aryan khan kishor gosavi manish bhanushali

मुंबई: मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणी NCB ने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलं होतं. पण याचप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत खळबळजनक आरोप करत NCB च्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी असं म्हटलं आहे की, एकूण परिस्थिती पाहता ही संपूर्ण कारवाईच बनावट आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत आता NCB ने खुलासा करणं गरजेचं आहे.

पाहा नवाब मलिक यांनी NCB आणि भाजपवर नेमके काय आरोप केले आहेत:

'राजीव गांधी यांच्या इच्छाशक्तीमुळे NDPS कायदा देशात लागू झाला. देश ड्रग्समुक्त व्हावा यासाठी NCB ची स्थापना करण्यात आली. यावेळी राज्यांसह केंद्रीय एजन्सीला देखील तपासाचे अधिकार देण्यात आले. गेल्या 36 वर्षापासून आतापर्यंत या तपास संस्थेने अनेक रॅकेट उघडकीस आणले आहेत. गेल्या 36 वर्षापर्यंत या एजन्सीच्या तपासावर कधीही शंका घेण्यात आली नाही. पण आता मात्र, NCB च्या तपास यंत्रणेवर सवाल उपस्थित केले जात आहेत.'

'सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण हे हत्या प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी असं चित्र निर्माण करण्यात आलं की, ड्रग्ससाठी त्याची हत्या झाली. तेव्हापासून NCB चं झोनल ऑफिस लाइमलाइटमध्ये आलं. त्यानंतर त्या प्रकरणात बातम्या प्लांट करण्यात आल्या आणि बॉलिवूडचं नाव खराब करण्यात आलं. अनेक कलाकारांना समन्स देऊन चौकशीसाठी बोलावण्यात आलं.' असं नवाब मलिक म्हणाले.

आर्यनला NCB कार्यालयात घेऊन गेलेला तो व्यक्ती कोण?

'3 ऑक्टोबरला आपल्यासमोर आलं की, भारतात नुकत्याच सुरु झालेल्या क्रूझवर ड्रग्स पार्टी प्रकरणात एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतलं. हे आपण सर्वांनी माझ्यासारखंच टीव्हीवर पाहिलं असेल. यावेळी ANI या वृत्तसंस्थेने काही व्हीडिओ रिलीज केले. ज्यामध्ये आपण पाहिलं असेल की एक केस नसलेला माणूस आर्यनला NCB कार्यालयात खेचत घेऊन जात आहे.'

'त्यानंतर याच व्यक्तीचा आर्यनसोबतचा फोटो व्हायरल झाला. पण NCB ने याविषयी स्पष्टीकरण देताना असं म्हटलं की, हा NCB चा अधिकारी किंवा कर्मचारी नाही. मग हा व्यक्ती नेमका कोण? हा आमचा मोठा सवाल आहे. जर हा अधिकारी नाही तर तो आर्यनला NCB कार्यालयात कसं काय घेऊन जात होता?'

'आता याचा खुलासा आम्ही करणार आहे. जो व्यक्ती आर्यनला खेचून NCB कार्यालयात गेला त्याचं त्याचं नाव KP गोसावी आहे. तर एक दुसरा व्यक्ती जो अरबाज मर्चंट याला घेऊन जात होता. त्याचं नाव आहे मनिष भानुशाली. हा मनिष भानुशाली देखील NCB चा अधिकारी नाही. तर तो भाजपचा उपाध्यक्ष आहे.' असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

'तो' तर भाजपचा उपाध्यक्ष मनिष भानुशाली आहे'

'मनिष भानुशाली याचे फोटो मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत आहेत. देवेंद्र फडणवीसांसोबत आहे, गुजरातच्या अनेक मंत्र्यांसोबत आहेत, केंद्रीय मंत्र्यांसोबत आहेत. त्यामुळे आता NCB ला सांगावं लागेल की, मनिष भानुशाली याचे NCB शी काय संबंध आहेत.' असा सवाल नवा मलिक यांनी केला आहे.

mumbai drug case ncb raid forgery ncp nawab malik allegations aryan khan kishor gosavi manish bhanushali
ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक; सुप्रिया सुळे म्हणतात...

'हे संपूर्ण प्रकरणच बनावट आहे'

'जेव्हा हे सगळं शनिवार आणि रविवारी सुरु होतं तेव्हा एनसीबीने काही फोटो चॅनलच्या प्रतिनिधींना पाठवले. ज्यामध्ये चरस, कोकेन आहे असं सांगण्यात आलं. या गोष्टी आम्ही क्रूझवर जप्त केल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पण NDPS कायद्यात जप्तीची एक प्रक्रिया आहे. हे जे फोटो आहेत ते कोणत्याही क्रूझवरील नाहीत. हे फोटो झोनल डायरेक्टरच्या ऑफिसमधील आहे. त्याचा एक व्हीडिओ मी तुम्हाला दाखवतो.'

'जेव्हा ड्रग्स प्रकरणात छापेमारी होते तेव्हा जप्त केलेल्या वस्तूंचा पंचनामा केला जातो. हा सगळा जप्तीचा माल कोणासमोरही उघडता येत नाही. फक्त कोर्टात मॅजिस्ट्रेटच्या समोर ते उघडलं जातं आणि तात्काळ सील केलं जातं. त्यामुळे हे व्हिडीओ, फोटो यातून हेच दिसतं की, या वस्तू क्रूझवर सापडलेल्या नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणच बनावट आहे.'

'माझा पहिला प्रश्न आहे की, गोसावी आणि भानुशाली यांचा NCB सोबत काय संबंध? NCB एखाद्या छाप्यात बाहेरील लोकांना घेऊन धाड मारु शकते का? त्यामुळे हे दोघे NCB कार्यालयात आणि छापेमारीत नेमकं काय करत होते हे स्पष्ट होणं गरजेचं आहे.'

'केपी गोसावी याचं फेसबुक प्रोफाइल गेल्या दोन दिवसांपासून लॉक आहे. पण मनिष भानुशालीचं प्रोफाइल आम्ही ट्रॅक केलं आहे. त्यातून असं दिसून येतं की, हा भाजपचा पदाधिकारी आहे.' असं म्हणत नवाब मलिक यांनी आर्यन खानच्या अटकेप्रकरणी NCB वर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत.

'महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे प्रयत्न'

'गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडीला वेगवेगळी प्रकरणं रचून बदनाम करण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. संपूर्ण एनसीबीचा वापर हा भाजप आपल्या विरोधकांना बदनाम करण्यासाठी करत आहे.' असे अनेक गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत.

Related Stories

No stories found.