Cordelia Cruise: क्रूझवरील तब्बल 209 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, 832 जणांचा रिपोर्ट येणं अद्यापही बाकी

Mumbai-Goa cruise 209 passengers corona positive: मुंबई-गोवा क्रूझवरील तब्बल 209 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे.
Cordelia Cruise: क्रूझवरील तब्बल 209 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, 832 जणांचा रिपोर्ट येणं अद्यापही बाकी
mumbai goa cordelia cruise 209 passengers are corona positive awaiting report of 832(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत आलेली कॉर्डेलिया क्रूझ (Cordelia Cruise) आता पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. या क्रूझने मुंबई-गोवा असा प्रवास करणाऱ्या एकूण 209 प्रवाशांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या क्रूझवर असलेल्या 1827 प्रवाशांपैकी सुरुवातीला 66 प्रवासी आधीच संक्रमित झाल्याचे आढळले होते. तर आता आणखी 143 लोकांना संसर्ग झाल्याचं आता समोर आलं आहे. अद्यापही 832 लोकांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळे या क्रूझवरील प्रवाशांची चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डेलिया क्रूझच्या प्रवाशांना मध्यरात्री बीएमसी बसने सीएसएमटी स्थानकाजवळ सोडण्यात आले. याच लोकांशी जेव्हा मुंबई Tak च्या प्रतिनिधीने संवाद साधला तेव्हा त्यांनी अशी माहिती दिली की, 'आमची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आम्हाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आम्हाला पुढील 7 दिवस होम क्वॉरंटाईन असावं लागणार आहे.'

दुसरीकडे 60 बाधित रुग्णांना भायखळ्यातील रिचर्डसन आणि क्रूडास जंबो कोव्हिड सेंटर आणि इतर ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. क्रूझवरील लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर मंगळवारी ही क्रूझ पुन्हा गोव्याहून मुंबईकडे रवाना करण्यात आली होती.

मुंबई बंदरावर क्रूझवर उपस्थित असलेले सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सची तपासणी करण्यासाठी बीएमसीची टीम बंदरावर पोहोचली होते. सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. कोणत्याही प्रवाशाचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत क्रूझमधून उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही. असं यावेळी सांगण्यात आले होते.

mumbai goa cordelia cruise 209 passengers are corona positive awaiting report of 832
मुंबईहून गोव्यात गेलेल्या क्रूझमधील 66 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांना गोव्यात उतरण्यास मज्जाव

याआधी कॉर्डेलिया क्रूझ ही गोव्याहून मुंबईला रवाना झाली होती. यामध्ये एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. यानंतर सर्व प्रवाशांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी पीपीई किट घालूनच एक टीम क्रूझवर गेली होती. ज्यानंतर या क्रूझवरील कोणालाही गोव्यात उतरु देण्यात आले नव्हते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in