रिचर्ड गिअर किसिंग प्रकरणात शिल्पा शेट्टीला दिलासा, बॉम्बे हायकोर्टाने केलं दोषमुक्त

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

2007 मध्ये राजस्थानमधल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात शिल्पा शेट्टीला रिचर्ड गिअरने भर कार्यक्रमात किस केलं होतं. तो तिचं चुंबन घेण्याचं थांबलाच नव्हता. या प्रकरणामुळे शिल्पा शेट्टी वादात अडकली होती. अश्लीलता आणि असभ्यतेचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. आता या प्रकरणी बॉम्बे हायकोर्टाने तिला दिलासा दिला आणि तिला दोषमुक्त केलं आहे. त्यामुळे तिला दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणी जी तक्रार शिल्पा शेट्टीच्या विरोधात करण्यात आली होती त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर महानगर दंडाधिकारी केतकी चव्हाण यांनी हा निष्कर्ष काढला की या प्रकरणात आरोपी क्रमांक एक म्हणजेच रिचर्ड गिअरच्या कृत्य शिल्पा शेट्टीला सक्तीने सहन करावं लागलं. पोलीस अहवाल आणि सादर करण्यात आलेली सगळी कागदपत्रं विचारात घेऊन त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला या गुन्ह्यातून मुक्त केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे हे प्रकरण?

2007 मध्ये एड्स जनजागृती संदर्भातला एक कार्यक्रम राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रिचर्ड गिअर आणि शिल्पा शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी बोलत होती. रिचर्ड गिअरला तिने जेव्हा स्टेजवर बोलावलं तेव्हा तो आला. त्यानंतर आधी त्याने तिच्या हाताचं चुंबन घेतलं. त्यानंतर तिला वारंवार मिठी मारून गालावर किस करत राहिला. या घटनेमुळे शिल्पा शेट्टी चांगलीच ओशाळली होती.

ADVERTISEMENT

तिने हसत वेळ मारून नेली मात्र घडलेला प्रकार तिच्यासाठीही अनपेक्षित होता. त्यानंतर या संदर्भातल्या वादाला तोंड फुटलं. शिल्पा शेट्टीने अश्लीलता आणि असभ्यता पसरवल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. राजस्थानच्या एका कोर्टाने या दोघांविरोधात अटक वॉरंटही काढला होता. मात्र नंतर हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं. त्यामुळे या दोघांना अटक झाली नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT